देशपांडे यांचा हा कृतघ्नपणा

 त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही...

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि. 16 (प्रतिनिधी)- शिवसेना ही निष्ठावंतांची संघटना आहे. शाम देशपांडे यांना महापालिकेत तीनवेळा प्रतिनिधीत्व दिले. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापालिकेतील गटनेतेपद, शहरप्रमुख, विधानसभेची उमेद्वारी अशी पदे देऊनही शाम देशपांडे समाधानी नव्हते. शिवसेनेबद्दल कृतज्ञ असण्याऐवजी त्यांनी कृतघ्नपणा दाखविला आहे. ते शिवसेनेत सक्रियही नव्हते, त्यामुळे त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही, असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे पुण्यनगरीत शाम देशपांडे यांनी बोर्ड लावले होते. यावरूनच देशपांडे यांची भूमिका स्पष्ट झाली होती. शिवसेनेने भरभरून देऊनही देशपांडे यांना त्याची जाणीव नसणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. ते शिवसेनेत सक्रिय नव्हतेच त्यामुळे ते असले किंवा नसले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना हा निष्ठावंत शिवसैनिकांचा पक्ष आहे, असे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी म्हटले आहे.   

Post a Comment

Previous Post Next Post