केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राडा..

 सतत होत असलेल्या गॅस,पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख : 

पुणे : पुण्यातील सेनापती बापट रोडवर एका हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, सतत होत असलेल्या गॅस,पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 


यावेळी स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्यात येणार होत्या,पण त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले.मात्र यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं आणि त्यांच्यात झटापट झाली. यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post