येथील वानवडी जनरल हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्यास आम आदमी पार्टीचा विरोध

वानवडी जनरल हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करून मोफत दर्जदार आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे...ऍड. मनोज माने

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुणे महानगरपालिकेचे वानवडी येथील वानवडी जनरल हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्यात येत आहें, या खाजगी करणाला आम आदमी पार्टी तर्फे विरोध करण्यात आला आहे.

 या बाबत महानगरपालिका आयुक्त यांना दिनांक 8/4/2022 रोजी वानवडी जनरल हॉस्पिटल चे खाजगीकरण करू नये, तसेच वानवडी जनरल हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करून मोफत दर्जदार आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे.या मागण्या करिता निवेदन देण्यात आले आहे . सदरच्या मागण्या मान्य न केल्यास जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मागण्या मान्य करून घेन्यासाठी  वानवडी जनरल हॉस्पिटल समोर आंदोलन करून जोरदार निषेध आम आदमी पार्टी तर्फी करण्यात आला .

सदरील आंदोलनास ऍड. मनोज माने, सर्फराज शेख, निजाम शेख अनवर शेख (बाबा) ,स्वप्नील पवार संगीता ठाकूर, विदयानंद नायक, दिनेश सॅमल, मनोज चोरडिया हजर होते.

वानवडी करांच्या  पैशातून दर्जेदार, मोफत आरोग्यसेवा देणे मनपाचे काम आहे. कर ही द्या आणि वरुन आरोग्य सेवा विकत घ्या... असले डबल टॅक्ससेशन सिस्टिम पुणेकरांना नकोत.रुग्णालये ठेकेदारांना देणाऱ्या मनपा आयुक्तांना हॉस्पिटल चालवणे जमत नसेल तर महानगरपालिका आयुक्त पदाची जबाबदारी देखील ठेकेदारांना देण्यात यावी.



Post a Comment

Previous Post Next Post