पॉईंट टू बी नोटेड : विद्यापीठ: प्रशासनाचे बदलते स्वरूप :

 पॉईंट टू बी नोटेड :          

   हम करे सो कायदा....

प्रेस मीडिया लाईव्ह :

लेखक : डॉ. तुषार निकाळजे :

व्यवस्थेत अथवा कामकाजामध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी विशिष्ट नियम- कायदे केलेले असतात .हे आपणास ठाऊक आहेच.परंतु नियम व कायदे यांचा वापर- गैरवापर -पळवाटा शोधणारे महाभागही कमी नाहीत.अशा प्रकारचा वापर करणारे व्यवस्थेतील जाणकार किंवा तज्ञ असलेले काही महाभाग याचा कसा वापर करतात,याचे एक उदाहरण पुढील प्रमाणे:- शासनाने सर्वच विभागातील व कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविण्याचे बंधनकारक केले आहे. हा नियम साधारणतः वर्ष २०१३-१४  पासून अमलात आला. पूर्वी कार्यालयीन हजेरी -पत्रकावर  स्वाक्षरी ग्राह्य धरली जात असे.परंतु आता बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे अथवा डोळ्यांचे स्कॅन करून कार्यालय हजेरी नोंदवण्याचे प्रकार अस्तित्वात आला.


 या नियमानुसार जर शासनाने नेमून दिलेल्या नियोजित वेळेत बायोमेट्रिक केल्यास व कार्यालय सोडताना नेमून दिलेल्या वेळेत बायोमेट्रिक केल्यास त्या दिवसाची हजेरी नोंदविली जाते व त्या दिवसाचा पूर्ण पगार अथवा वेतन ग्राह्य धरले जाते.महिन्याकाठी दोन वेळा लेट व दोन वेळा कार्यालय वेळेपूर्वी दोन तास आधी घरी जाण्याची अथवा उशिरा येण्याची परवानगी असते.याचे वेतन वजावट होत नाही.याव्यतिरिक्त जर बायोमेट्रिक नोंदीमध्ये अनियमितता आढळल्यास त्या कर्मचार्‍याचा - अधिकाऱ्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात केला जातो किंवा पूर्ण दिवसाचा पगार कपात केला जातो. विद्यापीठ क्षेत्रातील तज्ञ मंडळी व्यवस्थित रित्या  याचा फायदा घेतात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची महिन्याभरात सकाळी कार्यालयातील पाच ते दहा मिनिटे उशिरा गैरहजेरी झाल्यास त्याचा त्या दिवसांचा पगार कपात केला जातो किंवा त्याच्या अर्जित रजेमधून रजा वजावट केली जाते. 

परंतु याच कार्यालयातील  शासनमान्य पदावर पूर्ण वेळ नियुक्ती असलेला कायदा अधिकारी सायंकाळी ६:००  वाजता कार्यालय बंद होण्याची वेळ असताना सायंकाळी ५:२०  किंवा  ५:२५ यावेळी ब्रिफकेस घेऊन कार्यालय सोडून घरी जातो.इतर कार्यालयांप्रमाणेच विद्यापीठामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वसाहती व बंगले असतात. हा कायदा अधिकारी जर विद्यापीठातील बंगल्यात राहत असेल ,त्याचे विद्यापीठातील कार्यालय व वसाहतीमधील बंगला एक किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असेल आणि तो ५:२० मिनिटांनी कार्यालय सोडून घरी जात असेल व सायंकाळी ६:००  वाजता किंवा सहा ६:१० मिनिटांनी कार्यालय सुटल्यानंतर कर्मचारी घरी जात असताना हा कायदा अधिकारी टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, वॉकिंग शुज घालून फिरताना दिसत असेल, तर काय समजावे? याचा अर्थ कसा लावायचा? कायदा अधिकारी पाच वाजून वीस मिनिटांनी कार्यालयातून त्याच्या घरी जाऊन, कपडे बदलून, पुन्हा विद्यापीठ आवारात वॉकिंग करीत असेल तर,"कार्यालयातून  कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कधीही बाहेर गेलो, हम करे सो कायदा का ? तरी माझे कोणीच काही करू शकणार नाही".

म्हणजे संविधानातील तरतुदीनुसार सर्वांना समान नियम,वागणूक देण्याची तरतूद आहे. मग विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये हा भेदभाव का?यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे या कायदा अधिकाऱ्याच्यावर  एक वरिष्ठ कायदा अधिकारी कार्यालयात असताना व कायदा विभागाच्या समोरच कुलसचिव कार्यालय असतान, शेजारी प्रशासन विभागाचे कार्यालय असताना या सर्व नियम बाह्य गोष्टी कशा घडतात? याचे आश्चर्यही वाटते.याचा दुसरा राजकारणी अर्थ असादेखील काढता येईल 'या सर्व अधिकाऱ्यांची एकमेकांना साथ आहे का..?  हा वरिष्ठ पदाधिकारी व्यवस्थितपणा मध्ये फेमस.सकाळी ऑफिसला आल्यापासून ते सायंकाळी ऑफिस मधून बाहेर पडेपर्यंत नीटनेटका. डोक्यावरील केसांची एक बट देखील विस्कटू न देणारा,वेळोवेळी केसांना डाय लावणारा, हेअरस्टाईल देखील व्यवस्थित, रोज वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे, बूट- चपला वापरणारा, सायंकाळी घरी जाईपर्यंत कपड्याची एकही घडी विस्कटू न देणारा किंवा डाग न पडू देणारा. हा त्यांचा व्यवस्थितपणा कार्यालयीन कामकाजात आणल्यास समाजास खूपच उपयोग होईल असे वाटते .       

  कायदा अधिकारी कार्यालयातील बायोमेट्रिकच्या नोंदी ,विद्यापीठ आवारातील सायंकाळचे ५:२० ते ६:०० चे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तर या संपूर्ण गोष्टींचा उलगडा किंवा शोध लागेल. यासंदर्भात तक्रार केल्यास ही प्रशासकीय बाब आहे असे निश्चितपणे उत्तर  मिळेल. परंतु आयपीसी,सीआरपीसी,सीबीआय अशा प्रकारच्या नियमांचा वापर केल्यास हा गुन्हा देखील ठरू शकतो. 

पुढील भागात:- अत्युत्कृष्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षी खिरापत वाटप...

Post a Comment

Previous Post Next Post