सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील मुजोर अधिका-यांची बदली करा

 कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मागणीसाठी निदर्शने

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी : 

इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील मनमानी व आर्थिक हेराफेरी करणा-या सर्वच मुजोर शॉप इन्स्पेक्टर अधिका-यांची तातडीने बदली करावी ,या मागणीसाठी आज शनिवारी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे सादर केले.


राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्या माध्यमातून विविध सुविधा देण्याची कार्यवाही सुरु ठेवली आहे.यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे काम करणारे सर्व शॉप इन्स्पेक्टर हे नोंदणी अधिकारी म्हणून काम करत आहेत.परंतू सदर अधिकारी हे मंडळाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम करण्याऐवजी स्वतःच्या मनाने स्वतःचे नियम तयार करून काम करत आहेत.कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक बांधकाम कामगारांनी

दाखल केलेल्या ऑनलाइन अर्जात वेगवेगळी कारणे काढून अर्ज त्रुटीमध्ये काढत आहेत. परिणामी कामगारांना विनाकारण त्रास होत.याउलट संबंधित अधिका-यांनी नेमलेल्या एजंटांचे अर्ज  माञ आठ दिवसात मंजूर होवून  त्यांना लाभ मिळतो ,असा गंभीर आरोप बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केला आहे.तसेच

या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र ,त्याची जाणीवपूर्वक दखल घेतली जात नाही. याउलट तक्रारी करणाऱ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवले जातात.काही मुजोर अधिका-यांच्या या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे हजारो बांधकाम कामगारांचे नुकसान होत आहे.त्यामुळे संबंधित अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करुन दोषींची अन्यञ बदली करावी ,अशी मागणी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाव्दारे केली आहे.याच अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील मनमानी व आर्थिक हेराफेरी करणा-या सर्वच मुजोर शॉप इन्स्पेक्टर अधिका-यांची तातडीने बदली करावी ,या मागणीसाठी आज शनिवारी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे सादर केले.

यावेळी कामगार नेते भरमा कांबळे यांनी सदर मुजोर अधिका -यांची येत्या आठदिवसांत बदली न केल्यास अधिका-यांना काळे फासू असा इशारा दिला. 

या आंदोलनात कामगार नेते राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, आनंदा गुरव , नुरमहंमद बेळकुडे, राहूल दवडते ,कुमार कागले, आरंजय पाटील ,परसराम कत्ती, सद्दाम मुजावर , राहूल कडगावे, राजेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी , कामगार सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post