शिरूर शहरात कचरा डेपो मधे कचरा उचलणाऱ्या कामगार तरुणाचा मृतदेह आढळलाप्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख 

पुणे दि.१९  शिरूर नगरपालिका कचरा डेपो मध्ये एका कामगार तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्यामुळे शिरूर नगरपालिका आणि कचरा डेपोतील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारी पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. कचरा उचलणाऱ्या कामगारांना आरोग्य विषयी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहे का? कामगारांकडून जास्त वेळ काम करून घेतात  का ? अशा ही शहरात चर्चा होत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत इमरान अकबर सय्यद वय ३२ राहणार सय्यद नगर तालुका शिरूर जिल्हा पुणे, 

दि.१८/०५/२०२२ सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान शारुख युसुफ शेख यांनी फोन करून सांगितले की इमरान सय्यद कचरा डेपो येथे झोपला आहे,तो उठत नाही असं कळवल मी सदर जागी लागलीच जाऊन इमरान सय्यद याला आम्ही श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच इमरान सय्यद याला मयत घोषित केले . या बाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस अधिकारी प्रताप टेंगले करत आहे.

शिरूर नगरपालिका अधिकारी व मोरे मॅडम यांच्याकडून माहिती घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या घटने मुळे कचरा उचलणाऱ्या कामगार यांच्या आरोग्य विषयी प्रश्न निर्माण झाला आहे तसेच मयेत इमरान सय्यद  त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.तसेच बेजबाबदार अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी केली. 


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post