पॉईंट टू बी नोटेड : विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : यूनिवर्सिटी अंडर ड्रोन

 पॉईंट टू बी नोटेड:                          

   विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : यूनिवर्सिटी अंडर ड्रोन

प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ. तुषार निकाळजे :

एखाद्या विद्यापीठाचं सर्वेक्षण करायचे झाले तर त्यास नमुना म्हणून एखाद्या दिवशी सॅटॅलाइटद्वारे चित्र, शूटिंग व्यक्तींच्या हालचाली फुटेज घेतल्यास वेगवेगळी माहिती दिसेल. पण ही गोष्ट फारच कल्‍पना बाह्य किंवा खर्चीक आहे. त्यापेक्षा या विद्यापीठाच्या परिसरामध्ये दोन-तीन ड्रोन आकाशात सोडल्यास व विद्यापीठात घडत असलेल्या या माहितीचे संकलन केल्यास ते सहज शक्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्ती, अधिकारी,विभाग यांचे सर्वेक्षण करता येईल. समजा एखाद्या विद्यापीठ कार्यालयाची वेळ सकाळी १०  ते सायंकाळी ५:४०  आहे, तर या वेळेत  ड्रोनच्या चित्रीकरणाद्वारे पुढील घटना पाहावयास मिळेल. विद्यापीठातील वेगवेगळ्या प्रवेशद्वारामधून कर्मचारी लगबगीने बायोमेट्रिक द्वारे प्रवेश करतात. परंतु दोन-चार कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक झाल्यानंतर मागून येणार्‍या इतर कर्मचाऱ्यांना मुख्य द्वार  उघडणार नाही, त्यामुळे गेट जवळ कर्मचारी व सुरक्षा अधिकारी यांची शाब्दिक बाचाबाची  होईल.एखादा कर्मचारी नकळत वाक्य उच्चारले,"हे प्रशासन असलं भीकार्ड आहे की साध. बायोमेट्रिक प्रवेशद्वार देखील उघडत नाही. आता जर पाच मिनिटे उशीर झाला, तर कार्यालयात पाच मिनिटे उशीर होणार व त्यामुळे अर्धा दिवसाचा पगार कापला जाणार. आता या कार्यालय प्रमुखास हा सुरक्षा अधिकारी जाऊन सांगणार आहे का की पाच मिनिटे हे गेट उघडले नसल्याने १५ कर्मचाऱ्यांना उशिरा आत यावे लागले.

गेल्या दोन वर्षात तीन वेळा बायोमेट्रिक मशीन बदलले. अन्युअल मेंटेनन्स पैसे फुकट देतात का? काहीवेळा शहरांमध्ये रस्त्याचे बांधकाम फ्लाय ओव्हरचे बांधकाम, पुलांच्या दुरुस्त्या किंवा कार्यालयीन वेळेमध्ये मंत्र्यांचे आगमन झाल्याने रस्ता बंद केलेला, त्यामुळे कार्यालयात जाण्यास उशीर होतो. एखाद्या महिलेला  अशा प्रकारचा उशीर आल्यास दुसरी महिला अधिकारी हजेरी पत्रकावर लाल रेघ  मारण्यास सज्ज असते. बरेच जण सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर आपल्या स्वत:ची ज्यावर श्रध्दा  आहे, त्या व्यक्तीचे  लिहिलेले प्रार्थना किंवा श्रद्धा पुस्तक वाचतो. हा रोजचा नित्यक्रम असतो.अधिकारी यांचा नित्यक्रम कार्यालयात आल्या आल्या स्वतःची स्वाक्षरी झाली की ते हजेरी पत्रक टेबलवर घेऊन बसायचे. कोण उशिरा येतो ? कोणाची कशी फिरकी  घ्यायची, एखाद्याने गेल्या आठवड्यात साहेबास उलटे बोलले असते, हजेरी पत्रकावर उशिरा सही करताना त्याला चिमटा काढून त्याची जागा दाखवून द्यायची, हा ८० टक्के अधिका-यांचा उपक्रम किंवा दिनक्रम किंवा दिवसाची सुरुवात.दहा सव्वा दहा वाजता कार्यालय सुरू झाले की१०:३०  वाजता किंवा १०:४५ वाजता  एखाद्या कामगार संघटनेचा पदाधिकारी स्वतःच्या मुलीस किंवा मुलास कार्यालयाच्या गेट बाहेर शाळेत स्कूटर किंवा मोटर सायकल वर सोडविण्यासाठी  चाललेला दिसेल. ११:४५  किंवा १२ वाजता काही कर्मचारी जेवणाचे  १०-१५ डबे घेऊन जाताना दिसतील .

विद्यापीठ आवारात शैक्षणिक विभाग असल्याने विद्यार्थी खानावळ म्हणून कर्मचाऱ्यांकडे डबे घेतात. कर्मचाऱ्यांच्या गृहिणी स्वतःच्या पतीच्या संसाराला साथ देण्यासाठी हा कष्टप्राय  प्रवास करताना एखादा कर्मचारी जर १०  ते १५ डबे पोस्ट करत असेल तर आठवड्यातून दोनदा चार डबे तो काही अधिकाऱ्यांना मोफत देत असतो.परंतु हे चार डबे आपण उघडले तर यामध्ये वेगळे पदार्थ दिसतील. उदाहरणार्थ मटन रस्सा, चिकन रस्सा,मच्छी करी इत्यादी. या डब्यांचा हिशोब नंतर गंगाजळीत जातो. दुपारी १२:१५  ते १:००  या कालावधीत विद्यापीठातील वेगवेगळ्या कॅंटीनमध्ये चहाच्या निमित्ताने एकत्र जमणारे संघटनांचे पदाधिकारी रोज कोणत्या कर्मचार्‍यांच्या विषयावर चर्चा करतात? हे त्यांनाच माहीत. या संघटनांच्या कर्मचाऱ्यांना  बोलण्याची ताकत कोणत्या अधिका-यांमध्ये  नसते  का अधिकाऱ्यांचे हात कोणत्या कारणास्तव दगडाखाली असतात? हे त्यांनाच माहीत. दुपारी २: ००  ते २:३०  या कालावधीत जेवणाची सुट्टी असेल तर चित्र वेगळे.एखाद्या विभागातील महिलांचा गट जेवताना, एकमेकांना भाजी शेअर करताना चर्चा असते.या चर्चेमध्ये घरच्या अडचणी आणि मुलांच्या अडचणी, आई-वडील, सासू-सासरे यांचे आजारपण कार्यालयात कोणाचे कोणाशी  वाजले,आपण पार्टी कधी करायची, ड्रेस साड्या यांच्या पॅटर्न चर्चा रंगतात. 

पुरुषांच्या डबा ग्रुपमध्ये बरेच दिवस न झालेल्या संध्याकाळच्या मंद दिव्यातील रंगीत  पेयांसाठी कोणाला बकरा करायचा? याची चर्चा असते. कामगार संघटनांचे कार्यालय ज्या ठिकाणी असतात तेथे त्या  संघटनांचे पदाधिकारी व सदस्य जेवणाचा डबा खातात  आणि तेथील टेबलवरच डोके ठेवून चांगली पाऊन तास लांबकूक्षी (वामकुक्षी नव्हे) घेतात.दुपारी तीन नंतर कार्यालयात जातात. कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्यांची चंगळच असते. एखादा  कर्मचारी संघटनेचा ज्येष्ठ पदाधिकारी दुपारी ३:२०  मिनिटांनी चांगली सटकून झोप झाल्यानंतर तारवटलेल्या डोळ्यांनी तोंडामध्ये पानाचा किंवा गुटख्याचा तोबरा भरून कार्यालयात येताना दिसतो. यास कोणाचीही बोलण्याची  किंमत नसते. जेवणाची वेळ संपून गेल्यानंतरही दुपारी २:४०  मिनिटांनी विद्यापीठातील फूडम्वाल शेजारील झाडाच्या सावलीत दोन वेगवेगळ्या कामगार संघटनेतील सेवक  कोणत्या विषयावर गप्पा/चर्चा करतात? कार्यालयाबाहेर राहणारे कर्मचारी बिचारे नाईलाजाने का होईना,प्रामाणिकपणे वेळेवर येऊन स्वतःच्या टेबलवर बसतात. शेजारच्या टेबल वरचा माणूस अर्धा तास आला नाही ही तर या टेबलवर बसलेल्या माणसाला विनाकारण विद्याज्ञर्थी, प्राध्यापक,पालक, महाविद्यालयाचा  कर्मचारी यांचे बोलणे ऐकावे लागते. आपलेच दात अन् आपलेच ओठ. काही जण संगणकावर ड्रेस, दागीने  पाहण्यात मग्न. काही  कर्मचारी दुचाकी, चारचाकी पाहण्यात मग्न.काही कर्मचारी रोज दिवसातून तीनदा कार्यालयातील सेवा ज्येष्ठता यादी न चुकता बघणार. कोणाचे आरक्षण बदलले का? कोणास पदोन्नती दिली का? याकडे लक्ष. अकरा महिन्याच्या करारावर फंडातील तात्पुरत्या पदावर  एखाद्या माजी व्यवस्थापन परिषद सदस्याच्या  ओ्एस. डी. म्हणून नेमलेला अधिकारी कामगार संघटनेच्या पदाधिका-यास  सेवक वसाहतीमध्ये खोली मिळण्यासाठी वशिलेबाजीच्या गप्पा मारताना दिसेल,एखादा कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याशी तंबाखू मळत (घे डबल म्हणत) जगातील राजकारण, अर्थकारण, महामारी, हवामान, महायुद्ध यावर  वायफळ गप्पा ठोकताना दिसेल. हे सर्व महाभाग कधी स्वत:ची शैक्षणिक,मानसिक प्रगती कशी होईल याचा विचार देखील करीत नाही.याउलट एखादा प्रगती करीत असल्यास त्याला कशाप्रकारे खच्ची करायचा यावर संघटनेच्या कार्यालयात किंवा चहाच्या ठिकाणी चर्चा करताना दिसतात. बारा विद्यापीठांमध्ये  वीस वर्षांत कर्मचाऱ्यानी शैक्षणिक व संशोधनात्मक प्रगती केल्याची फक्त तीन उदाहरणे आहेत. दुपारी घड्याळाचा काटा चार वर आल्यास चहाची वेळ सुरुवात होते. मग प्रत्येक जण आपापल्या सवडीने पाच तीस पर्यंत चहा घेतात काही ठिकाणी विभागांमध्ये कार्यालयाच्या खर्चाने चहा येतो. महिन्यातून चार वेळा तरी या चारच्या चहाच्या वेळे मध्ये केक कापून वेफर्स सामोसे कटलेट पॅटीस त्यासोबत वाढदिवस साजरे केले जातात कधीकधी मटकी भेळ पाणीपुरी असा बेत असतो दोन महिन्यांनी दहा दुपारच्या जेवणाच्या वेळी छोटीशी जेवणाची पार्टी देखील अरेंज केली जाते तेवढाच विरंगुळा कर्मचारी फक्त ऑल टाईम इन्क्रिमेंट वेतन वाढ एवढ्याच गप्पांवर समाधान मानत परंतु अधिकाऱ्यांच्या गप्पा मलई बर्फी खाण्यात असतात दुपारी लंच टाइम मध्ये अधिकारी देखील गटागटाने फिरताना दिसतात यांच्या चर्चेचा कानोसा घेतल्यास कोणाला या आठवड्यात धोबीपछाड मारायची याची चर्चा चालू असते कर्मचारी काही आकड्यांवर अल्पसंतुष्ट असतात त्याचा गैरफायदा इतर घेतात मी सहजच एकदा दुपारी चार तीस वाजता एका विद्यापीठ कार्यालयात कामासाठी गेलो होतो तेथून बाहेर पडताना एक 75 वर्षाचा म्हातारा ग्रहस्थ जाताना दिसला मी कॅन्टीनमध्ये चहा पिताना त्या विद्यापीठातील काही कर्मचारी त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडे बघून चर्चा करीत होते त्या चर्चेमध्ये एक जण म्हणाला हा मान माणूस गेली दहा ते पंधरा वर्ष सायंकाळी 4:30 ते सहा या यावेळेत विद्यापीठात वॉकिंग करत असतो दोन दिवसांनी मी माझ्या काय शॉर्ट लिव्ह घेऊन पुन्हा या विद्यापीठात आलो साडेचार वाजता त्या म्हाताऱ्या गृहस्थाच्या मागे मागे हिरो लागला त्याला मी चालू केला मला अशा व्यक्तींना सोलो करण्याचा असा एक छंद आहे आहे या म्हाताऱ्या माणसाला फॉलो करताना मी त्याला जवळून पाहिले हाफ पॅन्ट पांढरा टी शर्ट पायात स्पोर्ट्स शूज पर्यंत सॉंग्स हातामध्ये कोणती काठी नाही संपूर्ण विद्यापीठाचा परिसर तो चालत चालत होता मी त्याच्या मागे मागे फिरत होतो त्या वयस्कर रस्ताने एका पेरू वाली कडून पेरू घेतला वतो पैसे देऊन पुढे खात-खात चालू लागला एका चौकात आल्यानंतर त्याला स्कूटर वरील दोन विद्यार्थिनींनी एका विभागाचा पत्ता विचारला त्या माणसाने त्यांना न चुकता त्या विभागाचा शोर्टकट सांगितला त्या दोन मुली त्या म्हाताऱ्या ग्रस्तांना थँक्यू म्हणून निघून गेले पुढे चालत चालत तो मस्फ ग्रस्त एका चौकात आला तेथे एक मुलगा व त्याचा पालक बोर्ड पाहत होते त्या वयस्कर माणसाने त्यांना विचारले आपको कहा जाना है त्या मुलाच्या पालकांनी विद्यापीठाच्या एका विभागाचे चे नाव सांगितले तो माणूस म्हणाला इस तरफ से जाऊ जल्दी करून जाओगे असे करत करत त्या माणसाने पूर्ण विद्यापीठाच्या आवारात चक्कर मारली व सायंकाळी पाच तीस वाजता विद्यापीठाच्या गेटमधून निघून गेला.मी पुरता दमलो होतो. मला असली चालण्याची सवय नव्हती. मी कॅन्टीनमध्ये बसून चहा पिलो.पण मला या म्हाताऱ्या व्यक्तीतील एक गुण सापडला. या माणसामध्ये रोज एका विशिष्ट वेळी चालण्याची कृती करण्याचे सातत्य होते. परंतु प्रामाणिकपणे एखाद्याला रस्ता दाखवण्याचा चांगला गुण उपजत होता. मी चहा पिता पिता व्यवस्थेतील अधिकाऱ्यांची तुलना या वयस्कर व्यक्तीच्या वागणूकीशी केली , हे अधिकारी चांगल्या गोष्टींना कसा विलंब लावतील, त्याला किती फाटे फोडतील, त्याला किती अडचणी आणतील हे न सांगितलेलेच बरे. चांगल्या कामात सातत्य ठेवून संस्थेची उंची वाढवण्या पेक्षा वाईट कृत्यांमध्ये रस घेऊन त्या संस्थेचे कसे खच्चीकरण होऊ शकते? याचे उदाहरण म्हणजे गेल्यावर्षी वर्ल्ड रांकिंग मध्ये काही विद्यापीठांचे मानांकन १००  ने घसरल्याचे आपणास माहीतच आहे. सायंकाळी  ६:०० नंतर काही विभाग रात्री ८:०० वाजेपर्यंत चालू असतात.तेथे कर्मचारी काम करत असतात. परंतु काही अधिकारी सायंकाळी ६:३०  ते ७:३०  या वेळेत न चुकता शॉपिंग करताना दिसतात. परंतु वर्षाकाठी पर्यवेक्षण भत्ता घेण्यास चुकत नाही. काहीजण सायंकाळी सहा वाजताच कार्यालयातून पळ काढतात, परंतु तेराव्या महिन्याचा पगार म्हणून पर्यवेक्षण भत्ता  हक्क म्हणून निर्लज्जपणे घेतात. बराच वेळ विद्यापीठात रात्रीचा फेरफटका मारल्यास रात्रभर लाईट लावून बांधकाम चालल्याचे दिसते. हे द्रृष्य बजेट संपण्यापेर्वी दिसते. काही ठिकाणी शूटिंग चालू असल्याचे दिसते. हा रात्रीचा खेळ चालू असतो. पण दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर हा रात्रीचा खेळ बंद होतो. दिवसभरात  पदाधिकाऱ्यांकडे येणारे गेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे. विद्यार्थी, पालक ,महाविद्यालयाचे कर्मचारी, प्राचार्य, प्राध्यापक हे वगळता इतरही व्यक्तींची रेलचेल चालू असते. यामध्ये अपॉइंटमेंट न घेतलेले सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढाऱ्यांचे पी.ए.किंवा राजकीय पुढारी,संस्थाचालक, कंत्राटदार यांचा समावेश असतो. हे काहीही असले तरी ड्रोन वापरण्याची परवानगी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. कारण या कृत्यांचा चित्रपट अधिकाऱ्यांनी पाहिल्यस फिल्मफेअर अवॉर्ड मिळेल किंवा हकालपट्टी होईल  हे योग्य वेळ आल्यानंतरच कळेल.

Post a Comment

Previous Post Next Post