आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या आदेशा नंतर मनसै निकांकडून भोंग्यांच्या काही ठिकाणी पहाटेच्या अजाण वेळी मशिदीं समोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. परंतु आज मनसेकडून राज्यात सर्वत्र मशिदींसमोर भोंगे लावण्यात येत असताना पक्षाचे नेते वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट कालपासून ते नॉटरिचेबल झाले आहेत. त्या मुळे वसंत मोरे नेमके  गेले  कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला तो त्यांच्याच पक्षातील वसंत मोरे यांच्या रुपात. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. पण आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. कालपासून ते नॉट रिचेबल आहेत. विरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post