इचलकरंजीत रमजान ईद सण उत्साहात साजराप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  / प्रतिनिधी

येथील ईदगाह मैदान येथे आज मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सणानिमित्त सामुहिक नमाज पठण केले.यावेळी पोलीस प्रशासनाबरोबरच पालिका व महसूल प्रशासनाने सर्वांचे करत ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा केला.या सणाच्या पार्श्र्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

इचलकरंजी शहरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सण-उत्सव साजरा करण्यावर शासनाने कडक निर्बंध घातले होते.पण सध्या कोरोना महामारी कमी झाल्याने पुन्हा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.इचलकरंजी येथे ईदगाह मैदानावर आज  सकाळी रमजान ईद सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून एकमेकांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून चांगली व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासन , नगरपालिका प्रशासन तसेच महसूल प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड ,डिवाय एसपी , बी.बी.महामुनी , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल ,अप्पर तहसीलदार शरद पाटील या सर्वांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईद सणानिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांबरोबरच सर्व नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले.तसेच शहरात ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.यामध्ये हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्याने सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते.एकंदरीत , पोलिस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सण साजरा करत आनंद व्दिगुणीत केला.

Post a Comment

Previous Post Next Post