पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार, अशी भाजपा कार्यकर्त्यांना भूमिका ठेवावी लागेल .खासदार गिरीश बापट..

प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवर अली शेख :

 पुणे : पुणे महानगरपालिकेतील जागा २० वरून २५ करायच्या असतील तर पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार, अशी भाजपा कार्यकर्त्यांना भूमिका ठेवावी लागेल असे खासदार गिरीश बापट यांनी महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना  सांगितले.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाची वाटचाल या मराठीतील अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार बापट यांनी प्रभाग रचनेसाठी, विशिष्ट प्रभागासाठी इच्छुकांना स्पष्ट इशारा दिला. दरम्यान, हा फॉर्म्युला अंमलात आणल्यास अनेक दिग्गजांना फटका बसू शकतो, अशी चर्चा पुण्यात सुरू आहे.


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात आणि विजयी होतात. उद्या मला वॉर्ड बदलायला लावला तर स्मृती इराणी आणि चंद्रकांत पाटील काय बोलले, हे आपण काही ऐकलं नाही, असे सांगत आपण आणि आपलं साम्राज्य, असा करू नका. काही लोक एक इंचही हलायला तयार नाहीत. लोक जिथे जातात तिथे निवडून येतात. चंद्रकांतदादा, आपल्याला पुण्यात वीस ते पंचवीस जागा जिंकायच्या असतील तर आज इथे अनेक दिग्गज आहेत. पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना पक्ष म्हणेल तिथे जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे, असे भूमिका ठेवावी लागणार असल्याचे बापट यांनी सांगितले.


प्रेस मीडिया लाईव्ह

अनवर अली शेख ( सह संपादक )

Post a Comment

Previous Post Next Post