पॉईंट टू बी नोटेड ....

 पॉईंट टू बी नोटेड ...               

प्रेस मीडिया लाईव्ह :

लेखक : डॉ.तुषार निकाळजे

विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप ...


वरील विषयावर एक लेखमाला सुरु करीत आहोत.विद्यापीठ प्रशासन,महाराष्ट्र विद्यापीठ कायदा ,नागरी सेवा नियम, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली कायदा व निर्णय, मनुष्यबळ विकास मंत्रालय,सामाजिक न्याय विभाग यांचे कायदे व विद्यापीठ क्षेत्रातील प्रशासनाच्या कामकाजाच्या घडामोडी यांचा एकमेकांशी असलेला संबंध या विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. 

विद्यापीठ हे समाज निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पूर्वी गुरुकुल ते आजचे कुलगुरू व अधिकारी यांची समाजाच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा असतो,हे सांगण्याची आवश्यकता नाही.  तरीदेखील गेल्या तीन ते पाच वर्षांमध्ये जागतिक स्तरावरील विद्यापीठांचे मानांकन ८०  ते १०० क्रमांकाने घसरणे ही गंभीर बाब वाटते. यासंदर्भातील विद्यापीठ प्रशासन हा एक  महत्वाचा भाग मानला जातो व त्या विषयावरील चर्चेचा या लेखमालेत समावेश करण्यात आला आहे.यासंदर्भातील काही माहिती माहिती अधिकार नियमान्वये मागविण्यात आली आहे. 

या सर्वांचा अभ्यास केला असता विद्यापीठ प्रशासनाचे एक चित्र पुढे येते,ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घरामध्ये एक जण तरी उच्च शिक्षण किंवा संशोधन करीत असतो. शेतकरी, रिक्षावाला,भाजीवाली, वडा-पाव विकणारे यांच्यापासून ते राजकारणी ,मंत्री, व्यावसायिक यांची मुले- मुली महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षण घेत असतात . या सर्व कामकाजाचा राजकारणाशी निगडीत असलेल्या संकल्पनांची तुलना  केल्यास वेगळे चित्र समोर येते.डॉ.तुषार निकाळजे यांनी या विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.डॉ.तुषार निकाळजे हे निवडणूक, प्रशासन, उच्च शिक्षण, विद्यापीठ शिक्षण, विद्यापीठ कायदा या विषयांचे अभ्यासक आहेत. 

पुढील भागात:- लेखमाला सुरू करण्याचे कारण....

Post a Comment

Previous Post Next Post