खिदमत आवाम KWA संस्था तर्फे ईद मिलन सम्मेलन आयोजित करण्यात आले

 पिंपरी चिंचवड येथील मुस्लिम समाजाने हिंदू मुस्लिम बांधिलकी जपत हम सब एक हे असा आदर्श निर्माण केला...

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : 

पिंपरी चिंचवड दि. 3 शहरातील ( KWA ) खिदमत आवाम वेलफेअर असोसिएशन संस्था च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.  ईद उल फितर दिवशी खिदमत आवाम वेलफेअर असोसिएशन तर्फे निगड़ी पवळे ब्रिज खाली  नुरानी मस्जिद समोर तसेच आकुर्डी येथे अक्सा मस्जिद समोर, ईद मिलन सम्मेलन शीर खुर्माचे वाटप आयोजन करण्यात आले होते . शहरातील विविध ठिकाणी या कार्यक्रमाचा संस्थेमार्फत आयोजन करण्यात आले. सर्व नागरिकांसाठी विना भेद भाव गोड गोड पदार्थ व गुलाबाचे फूल देऊन ईद मुबारक व अक्षय तृतीया ची हार्दिक शुभेच्छा सर्व नागरीकांना मुस्लिम तरुण देत होते.


सम्मेलनामध्ये सर्वधर्मीय बांधवासोबत, सरकारी कर्मचारी, खाजगी कर्मचारी, पुलिस, विविध संस्थाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिर खुरमाचा  आस्वाद घेतला.संस्थेचे अध्यक्ष सोहेल मोमिन यांनी सांगितले कि आपण आपल्या देशाची एकता जपून ठेवणे ही काळाची गरज आहे.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अशफाक बांगी यानी सांगितलेकी आपण राजकारणी लोकांच्या राजकारणाला बळी न पडता आपली एकात्मता आणि सभ्यता जपावी. हिंदू मुस्लीम भाई भाई होते आणि  सदैव रहातील या देशात अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://youtu.be/qsbEUVxH_1A

सम्मेलनामध्ये रिजवान शेख, नईम पटेल, हुजैफा खान, जावेद झेंडे, आसिफ शेख,वाजीद कमाली, नाजिम नालबंद, शादाब सैयद, अजहर शेख, मजहर शेख हन्जाला खान, मोनिस खान, उस्मान खान, सकलेन कमाली,शकूर मुल्ला, ओवैस खान, वसीम इनामदार, यासीन इनामदार, शादाब मोमीन, हरिश खान व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



प्रेस मीडिया लाईव्ह 

सह संपादक अन्वरअली शेख.

Post a Comment

Previous Post Next Post