रविंद्रनाथ टागोर वाचनालयाची डागडुजी करा

 इनाम संघटनेची पालिका प्रशासनाकडे निवेदनाव्दारे मागणी...


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील पालिकेच्या रविंद्रनाथ टागोर वाचनालयात मुलभूत सुविधा पुरवाव्यात तसेच शहरातील कूपनलिका दुरुस्ती करण्याबाबत इनाम सामाजिक संघटनेच्या वतीने आज पालिकेचे  प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.


इचलकरंजी पालिकेचे शहरात रविंद्रनाथ टागोर वाचनालय व अभ्यासिका आहे.सदर इमारत पालिकेच्या अखत्यारीत असून येथे वर्षाकाठी जवळपास ८०० विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेतात.सदर वाचनालय ही चांगल्या पद्धतीने चालते.परंतू , याठिकाणी

काही गैरसोयी निदर्शनास आल्या असून सदर विद्यार्थ्यांची वार्षिक वर्गणी पालिका प्रशासनाने ४५० रुपये केली असून ती तातडीने रद्द करावी .सदर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले टेबल खराब झाले आहेत. ते नविन बसवावेत,सदर इमारत जुनी होत असल्याने वरच्या स्लॅबवरून पावसाळयात पाणी अभ्यास करणाऱ्या मुलांच्या अंगावर गळत असल्याने वरील बाजूस दुरुस्ती करून घेण्यात यावी.

दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करून अभ्यासिका अजून सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करावेत.जेवणासाठी बसण्याची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही सुरू करावेत, कुपनलिका सुरू करावी, वाचनालयाची स्वच्छता नियमित व रंगरंगोटी व्हावी. सदर वाचनालयात विद्यार्थ्यांची नियमित भेट घेऊन अडीअडचणी समजावून घ्याव्यात अशी मागणी 

इनाम सामाजिक संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप टेंडर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.तसेच इचलकरंजी शहरात जवळपास ७०० कूपनलिका आहेत.सदर कूपनलिका विविध ठिकाणी असून यातील नादुरुस्त कूपनलिका व टायमर नसलेल्या कूपनलिकांना टायमर बसवावे, कूपनलिकांमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.याशिवाय 

पालिकेच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा विद्युत बिलाचा भार पडत असतो.काही कूपनलिका नादुरुस्त असून मक्तेदाराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात यावा व दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी प्रशासकांनी टागोर वाचनालयास भेट दिली असून सदर ठिकाणी सर्व मुलभूत सुविधा टप्प्याटप्प्याने पुरवण्यात येतील तसेच कूपनलिका दुरुस्तीबाबत अंदाजपत्रक केले असून ते त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता घेऊन दुरुस्तीचे काम आमदार व खासदार फंडातून होणार असल्याबाबत सांगितले.टायमर बसवण्याबाबत असलेल्या अडचणी सांगून तेथे पाणी नियोजन होऊन नागरिकांना पाणी मिळण्यासाठी नियोजन करत असल्याचे स्पष्ट केले.यावेळी इनाम संघटनेचे राजु कोन्नुर,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,जतीन पोतदार,अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post