निवडणूक आणि मतांपुरतचं पुणेकरांचा वापर करण्यात येतो का..?



प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : 

निवडणुका आल्या तरच राजकीय मंडळींना जाग येते का? पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या घोषणा करणारे  झोपेत सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंइय समस्यांबाबत नागरिकांची बाजू मांडणारा खंबीर पक्ष हरवल्याचं सदृश्य निर्माण झालेल दिसत आहे.निवडणुकांपुरतेच पुणेकरांचा वापर करण्यात येतो का..? असा प्रश्‍न सर्वसामान्य पडला आहे. 

महानगरपालिकेत 100 नगरसेवक निवडून आलेला भाजप गेल्या 5 वर्षांत सत्ताधारी होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीत राज्यात सत्तेत आहे. महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्‍त झाल्यानंतर हे सर्वच प्रमुख पक्ष केवळ   एकमेकांवर आरोप  करण्यात मग्न असून, ज्या मनसेला 2012 मध्ये पुणेकरांनी थेट महानगरपालिकेत विरोधीपक्ष नेतेपदी बसविले होते तो पक्षही मूग गिळून गप्प आहे.त्यामुळे, पुणेकर आणि राजकीय पक्ष महानगरपालिका अस्तित्वात असतानाच पुणेकरांच्या समस्यांसाठी पुढे येणार का..? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महानगरपालिका निवडणुका लांबल्याने पालिकेचे कामकाज प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात नगरसेवक नसल्याने प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. शहराच्या अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई आहे , तर नव्याने समाविष्ट 23 गावांची स्थिती त्या पेक्षाही कितीतरी विदारक आहे. एवढेच कमी की, काय म्हणून वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वासामान्यांवर आता मिळकत करवाढीचा बोजा पडला आहे. अशा स्थितीत शहरातील सर्वच राजकीय पक्षांकडून एखाद्या दिवशी शिष्टमंडळ घ्यायचे, आयुक्‍तांना निवेदन द्यायचे आणि माध्यमात छाती बडवून पुन्हा पुणेकरांना वाऱ्यावर सोडण्याचा  घाटसर्रास सुरू आहे.

पुणेकरांना गेल्या दोन महिन्यांत कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, त्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे यावर पाठपुरावा करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांना वेळच नाही. या उलट शहरातील समस्यांना ऊत आलेला असताना महाविकास आघाडीच्या धोरणाविरोधात आणि केंद्राच्या धोरणाविरोधात एखाद्या चौकात आंदोलन करणे, सोशल मीडियावर एकमेकांच्या नेत्यांची बदनामी करून त्यानंतर एकमेकांना मारहाण करत अपशब्द वापरत पोलिसांपर्यंत राजकीय वाद घेऊन जाऊन, एकमेकांच्या कार्यक्रमात घुसून परस्परविरोधी आंदोलने करणे अशा कारणांसाठी मात्र सर्वच राजकीय पक्षांना पुरेसा वेळ असल्याचे दिसत आहे. हे फक्‍त निवडणुकांसाठी ,  हा राजकीय स्टंट सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचे वास्तव आहे. राजकीय मंडळींना आता खरा आरसा दाखवण्याची संधी महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांना मिळालेली आहे  केवळ आणि केवळ निवडणुकांपुरतेच पुणेकर दिसतात का..? असा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

            आम् आदमी पार्टी ची जोरदार तयारी...

पुण्यात प्रथमच आम् आदमी पार्टी ने मनपा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मुळे इतर पक्षानी भ्रमात राहून चालणार नाही. 

प्रेस मीडिया लाईव्ह

  सह संपादक अन्वरअली शेख: 

Post a Comment

Previous Post Next Post