लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने १०० सेकंद स्तब्ध राहुन रा.छ. शाहू महाराज यांना उस्पुर्तपणे मानवंदना...


प्रेस मीडिया लाईव्ह :

  हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे.      

 लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने  आज शुक्रवार दि.६ मे २०२२ यादिवशी संपूर्ण कोल्हापूर  जिल्हा सकाळी १० वाजता  १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून रा. छ. शाहू महाराजांना मानवंदना देणेचा उपक्रम राबविण्यात आला. 

 हि स्तब्धता म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त सामूहिक वंदन ठरले. इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या कडून हि आपले सर्व व्यवहार १०० सेकंद थांबवुन रस्त्यावर जेथे आहे तिथेच  १०० सेकंद  थांबून हे स्तब्धतारुपी वंदन प्रथमच साकारले गेले. 

 आज शुक्रवार दि.६ मे रोजी सकाळी १० वाजता  इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणी पोलिस आणि  अग्निशमन वाहनाद्वारे सायरन वाजविणेत आला त्यानंतर १०० सेकंद  सर्व शहर वासीयांनी  आपले व्यवहार, वाहने आहे त्या ठिकाणीच थांबवून स्तब्धता पाळुन  रा. छ. शाहू महाराज यांना मानवंदना  दिली.

      इचलकरंजी शहरातील रा.छ.शाहू महाराज पुतळ्याजवळ   मानवंदनेसाठी माजी आमदार राजीव आवळे,अप्पर पोलिस अधिक्षक वैशाली गायकवाड, पोलिस उप अधिक्षक बाबुराव महामुनी, माजी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, अशोकराव स्वामी, माजी उप नगराध्यक्ष तानाजी पोवार,  जेष्ठ माजी नगरसेवक सागर चाळके, मदन कारंडे,रवी रजपुते,पोलीस निरीक्षक राजेंद्र ताशिलदार, महादेव वाघमोडे, विकास आडसुळ,उपमुख्याधिकारी केतन  गुजर, भाऊसाहेब आवळे, विठ्ठल चोपडे, युवराज माळी, अब्राहाम आवळे, मनोज साळुंखे, मंगेश कांबुरे, आदीसह नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख शहरातील विविध सामाजिक, स्वयंसेवी, संस्था तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

             त्याचबरोबर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडील सर्व स्वच्छता निरिक्षक , प्रभाग अधिकारी तसेच सफाई कामगार यांनीआपल्या कामाच्या ठिकाणीच मानवंदना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post