सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रमाद्वारे बंधुत्वाचा 'नवा करार ' !प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी त्यांच्या घरी सर्वधर्मीय रोझा इफ्तार कार्यक्रम आयोजित करून बंधू भाव,सामाजिक सलोख्यासाठी एक पाऊल उचलले .

' पुणे करार ' या इमारतीमधील त्यांच्या निवासस्थानी 27 एप्रिल रोजी सायंकाळी  आयोजित रोजा इफ्तार कार्यक्रमाने उपस्थित सर्व धर्मायांना बंधुत्वाचा जणू ' नवा करार ' अनुभवण्यास मिळाला.


सार्वजनिक ठिकाणी होणारे रोजा इफ्तार आणि सर्वधर्म समभाव विषयक उपक्रम घरोघरी झाले तरच खऱ्या अर्थाने परस्परांमधील प्रेम वृद्धिंगत होईल, अशी भावना या उपक्रमामागे असल्याचे जांबुवंत मनोहर यांनी पत्रकाद्वारे सांगितले .या रोझा इफ्तार कार्यक्रमाला 50 मुस्लिम बांधव आणि 50 अन्य धर्मीय बांधव निमंत्रित करण्यात आले होते.  जांबुवंत मनोहर, सौ. आम्रपाली जांबुवंत मनोहर ,    विद्या कांबळे, पायल बावस्कर, हर्षवर्धन कांबळे, जयवर्धन कांबळे, प्रकाश चव्हाण  आणि इमारतीमधील महिला वर्गाने संयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, भंते सुद्स्सन, आशीष जेम्स   अब्दुल कादिर कादरी, संदीप बर्वे, प्रसाद झावरे , सचिन पांडुळे, प्रकाश कांबळे, सुरज कुलकर्णी, गुलाम शेख, समीर खान, रियाझ पिरझादे, दिलीपसिंह विश्वकर्मा,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment

Previous Post Next Post