इचलकरंजीत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर सुरु

शिबिरातून चांगले व्यक्तीमत्व घडवावे - मुख्याध्यापिका गोंदकर...


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींनीउन्हाळी सुटीचा सदुपयोग करुन घेत आपले शरीर तंदुरुस्त करतानाच विविध खेळ व कलांमध्ये पारंगत व्हावे ,या उद्देशाने विनामूल्य उन्हाळी शिबीर सुरु करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी मुलींनी या शिबीराचा लाभ घेवून आपले चांगले व्यक्तीमत्व घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे , असे आवाहन केले.इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अभ्यासाबरोबरच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतात.याचाच एक भाग म्हणून उन्हाळी सुटीचा सदुपयोग व्हावा ,या उद्देशाने स्वर्गीय मदनलाल बोहरा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या हायस्कूलमध्ये विनामूल्य उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबीराचा शुभारंभ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे ,योग प्रशिक्षक सुहास पवळे ,कराटे प्रशिक्षक रविकिरण चौगुले ,किरण चौगुले यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या शिबिरात योगासन, लाठीकाठी, दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथील मल्लखांब, एरोबिक्स, शारीरिक श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये कवायत प्रकार, शिल्पकाम, नृत्य, विनामूल्य उन्हाळी शिबीर सुरु झाले गायन, क्राफ्ट, अभिनय, कराटे,लेझीम आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.यावेळी संगीत शिक्षिका सौ. ए. ए. रानडे ,पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, क्रीडा शिक्षक शेखर शहा , विभाग प्रमुख सौ. व्ही. डी. रावळ ,  आर.बी. कडाळे, एस्. एस्. ओमासे, एस्. के. लाड, एस्.एन्.पोवार, एम्. आर. चव्हाण ,व्ही. बी. वसवाडे , ए.एम्. पाटील, पी.डी. कुलकर्णी, व्ही. बी. कागले, ए.ए. निऊंगरे, एस्. पी. हिंगलजे, शारदा देशपांडे यांच्यासह शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post