मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुण्यात.

  अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे .  


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख (उप संपादक ) :

पुणे : महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या 13 मार्च रोजी पुण्यात उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते चक्क 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण उद्या अजित दादांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते. अजित दादा पवार यांचे उद्या पुण्यातील कार्यक्रम सकाळी 10 वाजता कात्रज डेउरी मधून जाणारा 24 मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा, दुपारी 1.15 विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा 1) पंचशील बुद्ध विहार 2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वानवडी, 3)संध्याकाळी 4.10 नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण नगरसेवक प्रदीप गायकवाड पंचशील चौक ताडीवाला रोड, ऑक्सीजन पार्क व भूमिपूजन सभा नगरसेवक सुनील टिंगरे खराडी आदी कार्यक्रम होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post