क्राइम न्यूज : चोरीस गेलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपीकडून जप्त.



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

चोरीस गेलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला ,रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे साहेब तसेच एडिशनल एसपी श्री अतुल झेंडे साहेब व रायगड अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री दयानंद गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली .कर्जत पोलीस ठाणे गुरनं 39/2022 भादवि क 457,380 कलमा अंतर्गत गुन्हा दि. 20/02/2022 रोजी दाखल आहे.

       सदर गुन्ह्याचा समांतर तपास  स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा रायगड यांचे कडून चालू होता. वरील गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल बाबत तांत्रिक तपास केल्यानंतर स्थागुशा चे PSI महेश कदम व त्यांचे पथकाने संयंशित आरोपी विजय विनोद वाघमारे वय-25 रा.खंडापे आदिवासी वाडी ता.कर्जत यास ताब्यात घेऊन विचारपूस करून त्याचे कडून वरील गुन्ह्यात चोरी गेलेला 10,000/-रूपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून  सदर आरोपीस जप्त  केलेल्या मोबाईलसह पुढील कारवाई करता कर्जत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे

       सदरची कामगिरी स्थानिक गुन्हाचे पोलीस निरीक्षक महेश कदम, पोह राजेश पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह प्रतीक सावंत, पोह राकेश म्हात्रे, पोह देवराम कोरम, पोशी-ईश्वर लंबोटी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post