सौ. तनया अनिकेत सावळेकर यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदानप्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख : प्रतिनिधी सुनील पाटील

भारतातील मानहानी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कायदे यावर डॉ. सौ. तनया अनिकेत सावळेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात   प्रबंध सादर केला असून   नुकतीच  त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.)   प्रदान करण्यात आली. डॉ. तनया सावळेकर यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई चे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच .डी पूर्ण केली.

डॉ .  सौ. तनया अनिकेत सावळेकर यांनी सन 2017 मध्ये त्यांचे पदव्युत्तर शिक्षण (LL.M.) पूर्ण केले आहे.त्यांचे स्पेशलायझेशन ‘फौजदारी कायदे’ आहे.2015 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत सायबर मानहानी चे कलम ६६-अ घटनाबाह्य घोषित करून रद्द करण्यात आले. त्यावर त्यांनी  त्यांच्याशिक्षणा दरम्यान निरीक्षण केले होते की यामुळे सोशल मीडियावरील भाषण स्वातंत्र्याचे नियमन करण्यासाठी कोणतेही कायदे नाहीत व या कमतरते मुळेअनेक समस्या उद्भवू शकतात. सोशल मीडियाचा प्रचार लक्षात घेता यामाध्यमा वरील भाषण स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, याचे महत्त्व त्यांना कळाले. 2016 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 499, ला घटनात्मकदृष्ट्या वैध घोषित करण्यात आले. कलम 499 मध्ये मानहानीसाठी फौजदारी शिक्षेची तरतूद आहे.एकीकडे न्यायव्यवस्थेने भारतीय दंड संहितेतील मानहानीचे कायदे कायमठेवले तर दुसरीकडे सायबर जगातील मानहानी चे कायदे घटनाबाह्य ठरवले.या मुळे लोक त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू शकतात. डॉ. तनया सावळेकर यांनी याचा अभ्यास केला आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 499 मध्ये सायबर मानहानीच्या कायद्याचे देखील समाविष्ट करण्याचे सुचवले. त्यांनी त्यांच्याअभ्यासात मानहानीच्या सर्व संबंधित प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम १२४-क, प्रजाक्षोभन चा देखीलअभ्यास केला व आपल्या प्रबंधात त्यातही काही बदल सुचवले आहेत.

डॉ. तनया सावळेकर यांनी आपले ध्येय नेहमीच उच्च ठेवले आहे.पदव्युत्तर शिक्षण संपताच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू केले, त्या गेल्या ५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी बी. सी. टी. कॉलेज ऑफ लॉ, पनवेल, डॉ.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ, नेरुळ यांसारख्या नामांकित कॉलेज मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शिकविले आहे.डॉ. तनया सावळेकर यांनी सन 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून सध्या के. एल. ई. कॉलेज ऑफ लॉ, कलंबोली, नवी मुंबई येथेसहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या येथे मास्टर् ऑफ लॉ च्या विभाग प्रमुख आहेत.

डॉ. तनया सावळेकर या वास्तुविशारद अनिकेत सावळेकर यांच्या पत्नीअसून माजी नगरसेवक  अरविंद सावळेकर यांची स्नुषा आहे, त्यांना त्यांच्यायशात त्यांच्या पतीचा तसेच सावळेकर व कमलाकर कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी त्यांची डॉक्टरेट त्यांचे वडील स्वर्गीय श्री. प्रमोद कमलाकर यांना समर्पित केली असल्याचे सांगितले  आहे.त्यांना सामाजिक कार्यात रस असून त्यांच्या अभ्यासावर पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व थरातून त्यांचे कौतुक होत असून अनेक मान्यवरानी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post