पिंपरी चिंचवडकराना मागील अडीच् वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा

 दिवसाआड पाणी पुरवठा मुळे पिंपरी चिंचवडकर झाले बेजार.

पाणी गळती रोखण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने  जागृती करावी

  अन्वरअली शेख :   (सह संपादक )

पिंपरी चिंचवड : चिंचवड शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.वाढीव १०० एमएलडी पाणी मिळेल.एप्रिल, मे महिन्यातील  कडक उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाई होणार नाही, असा विश्वास महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सायकलिंग चालू केली होती.  आज अडीचवर्षे उलटून गेले तरी, शहरवासीयांना दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. 

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.  वाढीव १०० एमएलडी पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव पाणी मिळेल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाणी गळती होणाऱ्या ठिकाणची माहिती मिळवावी जर महापालिका हद्दीत पाणी गळती होणाऱ्या ठिकाणची माहिती देणाऱ्यास  बक्षीस ( इनाम )जाहीर करण्यात यावा, व ती पाणी गळती बंद करुन वितरण व्‍यवस्‍था सुधारुन पाण्‍याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याची बचत करावी असे आवाहन करण्यात आले पाहिजे. पाणी गळती थांबवणे सद्या उन्हाळा पाहता गरजेचे आहे, अडीचवरषांपासून पिंपरी चिंचवडकर  दिवसाआड पाणीपुरवठा सहन करत आहे तरी संबंधित विभाग आणि नागरिक पाणी गळती बंद करण्यासाठी गंभीर होताना दिसत नाही.जर हीच परस्तीती राहिली तर भविष्यात मोठ्यप्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.

३५ % टक्के पाण्यापासून उत्पन्न नाही

शहरामध्ये करण्यात येणाऱ्या एकूण पाणी वाटपापैकी सरासरी  ३५ % टक्के पाणी “नॉन रेव्हेन्यू वॉटर’ आहे, म्हणजे या पाण्यापासून पाणीपट्टीचे उत्पन्न मिळत नाही. गळती, अनधिकृत नळजोड, झोपडपट्ट्यांतील नळजोड आणि महापालिका इमारतींसाठी देण्यात येणारे पाणी आदी कारणांमुळे या पाण्यातून महापालिकेला उत्पन्न मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात सध्या  १ लाख ६० हजार इतके अधिकृत नळजोड आहेत. महापालिकेला सध्या सरासरी वार्षिक ८० ते ९० कोटी रुपये इतके उत्पन्न पाणीपट्टीतून मिळत आहे. महापालिकेचे बुडणारे ३५% टक्के पाणीपट्टीचे उत्पन्न वाढल्यास पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नात भर पडू शकते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने या आधी ही अशी भरपूर आश्वासने दिली गेली आहे की दोन महिन्यात किंवा चार महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत होईल परंतु शहरी जनता मागील अडीचवर्ष पाणी पुरवठा दिवसाआड  सहन करत आहे तरी देखील पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झालेले नाही.

पिंपरी चिंचवड शहरातील आजी, माजी, आणि आगामी निवडणुकीत इच्छुक असलेल्या जन प्रतिनिधींनी बॅनर बाजी वर थोडी जागा करून जनतेला आणि पाणी पुरवठा विभाग यांना पाणी  गळती रोखण्यासाठी जागरूक करावे अशी अपेक्षा शहरातील सुशिक्षित  जनता करत आहे,


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post