रायगड पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग रायगड यांची गुन्हेगार क्षेत्रावर करडी नजर

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री राजेश पाटील यांची उत्तम कामगिरी.


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे साहेब तसेच एडिशनल एसपी श्री अतुल झेंडे साहेब व रायगड अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री दयानंद गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली गावठी कट्टा विक्री करण्यास जात असताना तपासण्यात आलेल्या तीन जणांच्या स्थानिक गुन्हे विभागाने मुसक्या आवळल्या.

    


दि.10/03/2022 रोजी  स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा रायगड अलिबाग चे पोह/राजेश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , मौजे कर्जत नेरळ रोड ने दोन व्यक्ती गावठी कट्टा विक्री करनेकारिता बदलापूर जिल्हा ठाणे येथे जाणार आहेत. 

     या बाबत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्था गु शाखेकडील पोसई/ महेश कदम आणि पथक यांनी एका काळे रंगाचे मोटार सायकल वरून येणाऱ्या दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावं गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे  खालील प्रमाणे.

1) रवींद्र आनंद वैद्य, वय 35 वर्षे राहणार दहिवली, तालुका कर्जत, 

2) सौरभ सुनील नवले वय-26 वर्षे रा.संत रोहिदास नगर, गुंडगे, तालुका कर्जत   

अशी असल्याचे सांगितले . सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. सदर बाबत त्यांच्याकडे  विचारणा केली असता त्यांनी सदर चा गावठी कट्टा हा 

3) सुनील त्र्यंबक वाठोरे, वय 36 वर्षे, राहणार पंचशील नगर, गुंडगे, तालुका कर्जत याचे कडून आणला असल्याचे सांगितले. वरील तिन्ही आरोपी त्यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

 सदर बाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 64/2022, भारताचा हत्यार कायदा 1959 चे कलम 3, 25 सह भा. द.वि.कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जप्त मुद्देमाल  :-

1) 25,000/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा.

2) 1000/- रुपये किमतीची एकूण दोन पितळी काडतुसे.

3) 15000/- रुपये किमतीची एक काळे रंगाचे पल्सर मोटरसायकल तिचा रजिस्ट्रेशन क्रमांक एम एच 46 v 1489.

आरोपींचा पूर्व इतिहास :-

      वरील आरोपीत यांचे पैकी सौरभ सुनील नवले याचेवर शिरवळ पोलीस ठाणे जिल्हा-सातारा येथे गुन्हा र.नं. 253/2021 शस्त्र अधिनिय 3,25 अन्वये गुन्हा दाखल आहे.

कामगिरी पथक :-

        स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडील पोसई/ महेश कदम, पोह/राजेश पाटील, पोह/येशवंत झेमसे, पोह/ प्रतिक सावंत, पोह/अमोल हंबीर, पोह/देवराम कोरम, पोहवा/ राकेश म्हात्रे .

     गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश धोंडे/कर्जत पो स्टे  हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post