ब्रेकिंग न्यूज : अति धक्का दायक : देहूरोड शहराच्या वार्ड क्र.4 पिण्याच्या पाण्यात चक्क आळ्या आढळून आल्या.प्रेस मीडिया लाईव्ह 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस


देहूरोड शहराच्या वार्ड क्रमांक ४ येथे पिण्याच्या पाण्यात आल्या आढळून आले आहेत, हा प्रकार आज शुक्रवार दि.११ रोजी सकाळी  घडला असता ( मलिक शेख अध्यक्ष देहूरोड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना ) यांनी तत्काळ  देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डच्या अधिकारी यांना दूरध्वनी करून  प्रकार कळवला. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कॅन्टोमेंट बोर्ड वॉर्ड क्र. ४ मध्ये पाण्यात किडे आढळून आले तेव्हा काही नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे अधिकारी राजन सावंत साहेब याच्याशी फोन वर माहिती  दिली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली अशी माहिती मलिक यांनी प्रेस मीडिया लाईव्ह ला दिली.प्रेस मीडिया लाईव्ह : 

 सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post