"विद्याचे माहेर घर की विद्यार्थी उपोषणकर्त्यांचे माहेर घर".. ?

 पुणे बार्टी 2018 च्या संशोधक विद्यार्थ्यांना एमफिल-पीएचडी सलग पाच वर्ष फेलोशिप मिळावी पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा फेलोशिप कालावधी तीन वर्षवरून वाढवून पाच वर्ष करण्यात यावा*

विद्यार्थ्यांची मागणी आहे की या बाबत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून आमचा प्रश्न लवकरात  लवकर सोडवावा.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख : (सह संपादक)

पुणे दि.११ बार्टी पुणे येथील कार्यालया बाहेर बसलेल्या उपोषणकरत्या विद्यार्थ्यांचा आज सलग तिसरा दिवस, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी तिसऱ्या दिवशी संशोधक उपोषणकर्त्या  विद्यार्थ्यांची भेट घेतली,समाज कल्याण कार्यालय जवळच आहे तरी  देखील तेथील अधिकारी मोरेश्वर व  गजबीये उपोषणच्या ठिकाणी फिरकले नाहीत व साधी चौकशी सुद्धा केली नाहीत. धन्य ते समाजकल्याण खाते व धन्य ते अधिकारी.

 उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम  आहेत ! इतिवृत्तावर समितीच्या अधिकारी वर्गाची सही होत नाही तोपर्यंत  आमरण उपोषण चालूच राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यानी या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे . बार्टी २०१८ च्या संशोधक विद्यार्थ्यांना एम . फिल.च्या संशोधनाकरीता दोन वर्षे फेलोशिप देते तर पीएच.डी. साठी तीन वर्ष फेलोशिप देते . विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ( UGC ) मार्गदर्शक तत्त्वानुसार एम.फिल . करीता दोन वर्षे तर पीएच.डी. करोता उर्वरित तीन वर्ष अशी एकूण पाच वर्ष सलग फेलोशिप दिली जाते . 

तसेच पीएच.डी. करीता स्वतंत्र्यपणे पाच वर्षे फेलोशिप दिली जाते . म्हणजे बार्टी मार्फत संशोधन करण्यासाठी देण्यात येणारी फेलोशिप ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देण्यात येत नाही . याउलट राज्यातील सारथी व महाज्योती या संस्था दरवर्षी जेवढे अर्ज येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फिलोशिप देतात ,तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या संस्था फेलोशिप देतात.

   मा . सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सतत निवेदने देऊन आमची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असेच सांगण्यात येत होते . सोबतच महाराष्ट्रातील आमदार , खासदार , मंत्री यांना देखील अनेकवेळा भेटून आमचा प्रश्न सांगितलेला आहे . बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याशी प्रत्यक्ष बोलून भेटूण व निवेदने देवून आमच्या प्रश्नाबद्दल कळविले आहे . मात्र यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी या शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २४/१२/२०२१ ते ०२/०१/२०२२ असे दहा दिवस बेमुदत साखळी उपोषण केले आहे . मा . सामाजिक न्याय मंत्र्यांनी उपोषाणास पहिल्यांदा भेट दिली . तेव्हा सकारात्मक चर्चा न झाल्याने दि . ०२/०१/२०२२ रोजी त्यांनी पुन्हा भेट दिली व या भेटीअंती आमची मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मा . सामाजिक न्याय मंत्र्यांनी देऊन आम्हाला उपोषण मागे घेण्यास सांगितले . 

आमच्या मागणीच्या अनुषंगाने दि . ०६/०१/२०२२ रोजी मा . सामाजिक न्याय मंत्र्यांच्या दालनात मुंबई येथे विद्यार्थ्यांना बैठकीचे लेखी दिलेले असतांना त्याविषयाच्या संदर्भात दि . ०५/०१/२०२२ रोजी बैठक घेण्यात आलेली असून तुमचा विषय अभ्यासण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल एक महिन्यात येईल आणि त्यानंतर तुमचा प्रश्न सुटणार असल्याचे कळविले . 

आम्ही उपोषण सोडून दोन महिने उलटले आहेत परंतु आमच्या मागणी संदर्भात अद्याप पर्यंत कोणतीही समिती नेमली नाही आणि अहवाल देखील मिळाला नाही . बार्टी महासंचालक व सामाजिक न्याय मंत्री यांना विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत . बार्टी महासंचालक आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सरळ - सरळ संशोधक विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे . म्हणून आमच्या न्याय मागणीच्या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी आम्ही बार्टी संशोधक विद्यार्थी संशोधनाचे काम थांबवून पुन्हा नव्याने दि . ०८/०३/२०२२ पासून बार्टी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषणास बसत आहोत . 

अशी माहिती पत्रकाद्वारे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.आमची मागणी मान्य व्हावी व आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमची मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील , असा ठाम निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post