आपआपल्या प्रभागां मधील उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लोकप्रतिनिधींची भागम भाग सुरू

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : येत्या १४ मार्च रोजी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाची पंचवार्षिक कालावधी  संपत असल्याने शिल्लक असलेल्या दोन दिवसांमध्ये आपआपल्या प्रभागां मधील उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लोकप्रतिनिधींची भागम भाग सुरू आहे. 


महानगरपालिकेच्या नगरसचिव खात्याकडून शनिवार दि. ११ व रविवारी होणाऱ्या ३० कार्यक्रमांची पत्रिका छापणे व ती सर्व मान्यवरांपर्यंत पोहोचविण्याकरिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यते नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या वास्तूंचे उद्घाटन सोहळे घेता येत असल्याने गुरुवारी (दि.१०) झालेल्या सर्वसाधारण सभेत हे सर्व विषय मंजूर करण्यात आले.  विशेष म्हणजे या मध्ये स्थानिक नेत्यांच्या व समाजातील अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध प्रभागांमधील होणारे सोहळे वेगळे असले तरी महापालिकेच्या माध्यमातून ३० कार्यक्रम होत आहेत.

यातील १० कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून ४ कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन कार्यक्रमांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेचा कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूल हा यातील महत्त्वाचा कार्यक्रम ठरणार आहे. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. इतर कार्यक्रमांमध्ये मैदान, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, लोकार्पण सोहळे होणार आहेत शनिवारी महापालिकेचे यात तीन कार्यक्रम असून उर्वरित २७ कार्यक्रम रविवारी होतील.

महापालिकेची औपचारिक किंबहुना गेल्या पाच वर्षातील कामकाजावरील आपले अनुभव व्यक्त करणारी सर्वसाधारण सभा सोमवार १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता विद्यमान महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येत असल्याने रविवारपर्यंतच / सर्व मान्यवरांकडून विविध कार्यक्रम करून घेतले जात आहेत. बुधवारी सकाळपासून महापालिकेचा कारभार इतिहासात दुसऱ्यांदा तेही तब्बल सन १९५८ नंतर प्रशासनाच्या ताब्यात जाणार आहे.


अनवरअली शेख  (सह संपादक)

Post a Comment

Previous Post Next Post