डॉ.तुषार निकाळजे यांना अमेरिकन विद्यापीठाची डि.लीट प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : डॉ. तुषार निवृत्ती निकाळजे यांना ब्रिटिश नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन मेरी ,अमेरिका यांनी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (सामान्य प्रशासन) ही सन्माननीय पदवी प्रदान केली आहे. डॉ.निकाळजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे गेली ३१ वर्षे शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. नोकरी करीत असतानाच त्यांनी एम. कॉम, एम. फिल. (कॉमर्स),पी.एचडी .(राज्यशास्त्र )या पदव्या प्राप्त केल्या आहेत .तसेच त्यांनी "भारतीय निवडणूक प्रणाली "या विषयावर संशोधन केले आहे .याची दखल महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घेऊन त्यांना वर्ष २०१९ मध्ये निवडणूक निष्णात व्यक्ती म्हणून संबोधले आहे. त्यांची काही पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमास समाविष्ट झाली आहेत. 


डॉ. निकाळजे यांनी आज पर्यंत १० पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत,तीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेतला आहे, दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरीता" अंडरस्टँडिंग युनिव्हर्सिटी" हे ब्रेल -इंग्रजी पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रशासन ,निवडणूक, राजकारण ,नागरी सेवा इत्यादी विषयांवरील ३२ लेख वर्तमानपत्रात, साप्ताहिकामध्ये प्रकाशित केले आहेत. डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत ०९ राष्ट्रीय व ०१ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित केले आहे .या सर्व कार्याची दखल घेऊन ब्रिटिश नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन मेरी, अमेरिका यांनी डॉ. निकाळजे यांना डॉक्टरेट ऑफ लिटरेचर सामान्य प्रशासन ही मानद पदवी प्रदान केली आहे .याप्रसंगी डॉ. निकाळजे म्हणाले ,"आजचा हा सन्मान  माझ्या एकट्या पुरता मर्यादित नसून जगातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बहुमान आहे".

Post a Comment

Previous Post Next Post