कासारवाडी परिसरातील प्रभाग क्र. ३० स्मशान भूमी, मुस्लिम दफन भूमी, भारतरत्न रतन टाटा. उड्डान पूल या ठिकाणी विकास कामांच भूमिपूजन

 नगरसेविका.मा.स्वाती माई काटे. यांच्या सतत प्रयत्न व पाठपुराव्याला यश..य


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

 जिलानी उर्फ मुन्ना शेख (उप संपादक )

पिंपरी चिंचवड दि.१२ कासरवाडी फुगेवाडी येथील प्रभाग क्रमांक ३० कासरवाडी या ठिकाणी मुस्लिम दफनभूमी व फुगे वाडी येथील समशान भूमी यांची बांधकाम खूप जुनी आहे.. स्लॅबचे पोपडे सुद्धा निघालेले व प्रवेशद्वार खचलेल्या  स्थितीमध्ये आहे, जेणेकरून विकासापासून वंचित राहिलेल चित्र निर्माण झालेले दिसत होते. शहरातील आजची वाढती लोकसंख्या नुसार आधुनिक पद्धतीची शमशान भूमि बांधून घेण्यात यावी  तसेच येणाऱ्या काळात लोकांना सोय व सुविधा उपलब्ध करण्यासाठी  मा. नगरसेविका स्वाती माई चंद्रकांत काटे यांनी सतत पाठपुरावा केला आणि आज  त्यांच्या प्रयत्नांना यश आले...

प्रभाग क्र. ३० मधील रखडलेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले, स्मशान भूमी, मुस्लिम दफन भूमी, भारतरत्न रतन टाटा. उड्डान पूल या ठिकाणी विकास कामांच भूमिपूजन   मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे  यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी  मा. नगरसेविका स्वाती माई काटे विविध मान्यवर अधिकारी वर्ग व परिसरातील समस्त नागरिक उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post