महाराष्ट्र राज्यातील राशन दुकानदार यांच्या सबलीकरणासाठी

  डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत राशन दुकाने होणार डिजिटल..

प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख : 

पुणे दि.२३ पुणे पिंपरी चिंचवड व  राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांना मजबूत व सबलीकरण करण्याच्या हेतूने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व  सीएससी-ई गवर्रन्स सर्व्हिसेस इंडिया लिमटेड ( CSC e - Goverance Service India limited ) यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या सबलीकरणासाठी समजोता करारनाम्यावर ( MOU )  स्वाक्षरी केली आहे. डिजिटल इंडिया ही मोहीम भारत सरकारने सुरू केलेली एक मोहीम आहे ,

या मोहिमेचा प्रथम उद्देश शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करून देणे असा आहे . महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुरवठा विभागाचे प्रधान सचिव  विजय वाघमारे  यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली राज्यातील रास्त भाव दुकानदार यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आज सीएससी-ई गवर्रन्स सर्व्हिसेस इंडिया लिमटेड (  CSC e - Goverance Service India limited ) या कंपनीसोबत करारनाम्यावर स्वाक्षरी झालेली आहे . सीएससी सेंटर च्या माध्यमातून राज्यातील रास्त भाव दुकानदार आता दुकानांमधून खालील सेवा देऊ शकतात.

*पुढील  सेवा भविष्यात कुठलाही रास्त भाव दुकानात उपलब्ध होणार आहेत*

१. बँकांचे सर्व व्यवहार २. रेल्वे विमान तिकीट बुकिंग ३. सर्व प्रकारचे बिल्स उदाहरणार्थ लाईट बिल , फोन बिल , पाणी बिल ४. हेल्थ केअर  सर्व्हिसेस ५. मोबाईल डीटीएच रिचार्ज ६. शेती विषयक सर्व सेवा ७. इन्कम टॅक्स आदि सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह 

  ( सह संपादक अन्वरअली )

Post a Comment

Previous Post Next Post