इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने घरफाळा आणि पाणी पट्टी वसुली साठी रॅलीचे आयोजनप्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी नगरपरिषदेची सन २०२१-२२ सालाची घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. घरफाळा वसुली साठी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी अरिफा नुलकर आणि कर निरिक्षक स्वप्निल बुचडे यांच्या नियंत्रणाखाली  विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली  कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. 


थकीत घरफाळा वसुली साठी नगरपरिषदे कडुन विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.या अनुषंगाने नगरपरिषदेकडुन आज गुरुवार दि.१० मार्च रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीचे आयोजन केले होते.  

नगरपरिषदे कडुन थकित घरफाळा आणि पाणी पट्टी वसुलीसाठी  जप्तीची कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहणार असल्याने शहरातील मिळकत धारकांनी आपला घरफाळा आणि पाणी पट्टी भरून जप्ती सारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचेकडून करणेत येत आहे.

      


   

Post a Comment

Previous Post Next Post