आता रेशन दुकानदारांची चलने देखील ऑनलाइन भरण्याची सुविधा शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने उपलब्ध....

 राशन दुकानदारांना शिधापत्रिका धारकांना राशन पावती देणे बाबत परिमंडळ कार्यालय यांनी सक्ती करावी


प्रेस मीडिया लाईव्ह

 अन्वरअली शेख : सह संपादक :

पुणे शहरात प्रथमच राशन दुकानदार ई चलन द्वारे ऑनलाईन भरणा करणार,  आता रेशन दुकानदारांची चलनेदेखील ऑनलाइन भरण्याची सुविधा शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना लवकर रेशनवरील धान्य मिळणार आहे. या पूर्वी राशन  दुकानदारांना धान्याच्या चलनाचे पैसे भरण्यासाठी परिमंडल कार्यालयामधे जाऊन भरणा करून कार्यालयामधून  मिळालेली चलनाची प्रत बॅंकेत भरणा करावी लागत होती, ही पद्धत अनेक वर्षांपासून चालू आहे. शहर व त्याअंतर्गत येणारी ११ परिमंडल कार्यालयांना येथून पुढे ही चलने ऑनलाइन पद्धतीने भरली जावी, अशा सूचना पुरवठा विभागाचे उपायुक्‍त  यांनी दिल्या होत्या ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुकानदारांना दोन दिवसांचा वेळ लागत होता. आता मात्र ई चलन द्वारे ऑनलाईन भरणा अधिक सुलभ आणि झ्टकन होणारी प्रक्रिया मुळे दुकानदारांचा वेळ वाचणार आहे.

परिमंडळ ह आणि म कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. तरी देखील पिंपरी चिंचवड शहरात देखील लवकरच ही प्रक्रिया राबवण्यात यावी तसेच,शिधा पत्रिका धरकांना दुकानदार यांनी वेळेवर योग्य प्रमाणात राशन पावती सह द्यावा ही सक्ती करण्यात यावी त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यात अडचण होणार नाही, शिधापत्रिकाधारकांकडून वारंवार तक्रार होत असते  की राशन दुकानदार पावती देत नाही. का देत नाही? परिमंडळ अधिकारी वर्ग व कार्यालयाकडून रेशन कार्ड धारकांना दुकानदाराने राशन ची पावती देणे बाबत सक्ती करावी ,त्यामुळे नागरिकांची फसवणूक देखील होणार नाही. असं नागरिकांना अर्थात शिधा-पत्रिका धारकांना वाटत असेल तर पावती सह राशन अशी सक्ती करण्यात आली पाहिजे.



प्रेस मीडिया लाईव्ह

( सह संपादक अन्वरअली )

Post a Comment

Previous Post Next Post