पुण्यात ११ वर्षीय मुलीवर तिच्या वडील व भावाकडून अनेकदा अत्याचार....

 मानवतेला लाजवणारी अशी अत्यंत गंभीर बाब समोर आली

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअलीशेख : सह संपादक 

पुण्यात अतिधक्का दायक घटना घडली असल्याचे आढळून आले.मानवतेला लाजवणारी अशी अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे

पुण्यात ११ वर्षीय मुलीवर तिच्या वडील व भावाकडून अनेकदा अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. आणि  आजोबा व मामाकडूनही या मुलीचा विनयभंग झाल्याचे समोर आलेले आहे. या सर्व प्रकरणी पीडित मुलीच्या या सैतानी  नातेवाईकांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित मुलीचे  सैतान आजोबा आणि तिचा राक्षस चुलत मामा यांच्याकडूनही अत्याचार झाल्याचे उघड झालेले आहे. यात संशयित आरोपी असलेल्या भावाला अटक करण्यात आली असून,इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तब्बल ६ वर्षापासून वडील आणि भाऊ अत्याचार करीत असल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आल्याने हे सर्व नाते कलंकित झाले आहे. वडील ,भाऊ,आजोबा, मामा, हे सर्व नात्यांना काळीमा फासणारी घटना समोर येताच शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे,मुली घरात नातेवाईक सुद्धा सुरक्षित नाही .शहरात आश्या घटनांचे प्रमाण वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदा करण्यात यावा भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून कडक पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post