तीन ते चार दिवसात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल ..रुपाली चाकणकर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : उपसंपादक :

पुणे : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या बलात्कार केलेल्या प्रकरणातील मुलगी पुण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक या प्रकरणात पोलीस कारवाई करत नाही, असा आरोप  केला आहे. त्यावर या प्रकरणी येत्या तीन ते चार दिवसात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल असे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगतले.

पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज पुणे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांना पीडित मुलगी मदत करते. असे विरोधकांचे म्हणणे आहे त्यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या, रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुलगी आणि चित्रा वाघ यांची नार्को चाचणी करण्याची मागणी आम्ही केली आहे. वडगाव शेरी व रघुनाथ कृचीक प्रकरणात विरोधकानी पोलिसांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे, असा आरोप रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.

मागच्या आठवड्यात वडगाव शेरीत झालेल्या एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या, वडगाव शेरीतील पीडित मुलीला आज आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट करण्यात आले आहे. त्यांना पूर्णपणे मदत दिली जाणार असून धर्मदाय आयुक्तांकडून रुग्णालयाचा खर्च केला जाणार. यासंदर्भात पुणे पोलिसांना आम्ही तपास करण्याचे आदेश दिले आहेत अहवाल आल्यावर कारवाई होणार, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post