विशाल सोलंकी (भाप्रसे) आयुक्त शिक्षण पुणे यांची नियुक्ती समाज कल्याण विभागात

 सुरज मांढरे (भाप्रसे ) यांची नियुक्ती शिक्षण आयुक्तपदी


प्रेस मीडिया लाईव्ह 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पुणे दि.११ पुणे शिक्षण आयुक्तांची बदली, समाज कल्याण विभागात पदभार स्वीकारावा असे  नियुक्ती पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


 विशाल सोलंकी भाप्रसे आयुक्त शिक्षण पुणे. शासनाने यांची बदली पुणे समाज कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी समाज कल्याण आयुक्त या पदावर प्रशांत नारनवरे ( भाप्रसे ) हे होते, शासनाने विशाल सोलंकी  ( भाप्रसे ) पत्रकाद्वारे तात्काळ आपण पदभार सांभाळावा असे कळवले आहे.

शासनाने आपली बदली केली असून , आपली नियुक्ती आयुक्त , समाजकल्याण , पुणे या पदावर श्री . प्रशांत नारनवरे ( भाप्रसे ) यांच्या जागी ते अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून केली आहे . आपल्या जागी श्री . सुरज मांढरे भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे . तरी आपण आपल्या सध्याचा पदाचा कार्यभार  मांढरे ( भाप्रसे ) यांच्याकडे सोपवून , नवीन पदाचा कार्यभार  नारनवरे ( भाप्रसे ) यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा असा आदेशपत्र पाठवण्यात आले आहे .विशाल सोळंकी , भाप्रसे (आयुक्त , शिक्षण , पुणे . 23 ) यांच्या बदलीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 अन्वरअली शेख : ( सह संपादक )

Post a Comment

Previous Post Next Post