देहूरोड शहरात अवकाळ्या पावसाची जोरदार बॅटिंग..

 वीज खंडित झाल्याने देहूरोड नागरिकांची धावपळ उडाली.


अनवरअली शेख : सह संपादक :

प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड दि.११ देहूरोड शहरात आज सायंकाळी ०६:३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली, दुचाकीस्वार उड्डाणपुलाच्या खाली उभे राहून गर्दी करू लागले. ढग तर कोसळत-च होतं पण  उड्डाणपुलाच्या वरून पडणाऱ्या पावसाच्या साचलेल्या घाण पाण्यामुळे ही पुलाच्या खालून जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. त्यात अजून भर म्हणून देहूरोड शहराचा विद्युत वीज पुरवठा ही खंडित झाला.या प्रकारा मुळे देहूरोड शहराच्या नागरिकांची धावपळ उडाली .

आज सकाळपासून-च  ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते.दुपार नंतर पाऊस पडण्याची शक्यता भासू लागली होती. तसेच मागील दोन-तीन दिवसांनी महावितरण यांचा विद्युत वीजपुरवठाही लपंडाव खेळत होता, जेणेकरून पावसाचं आणि विद्युत विजेचा काही वैर आहे का..? पावसाचं वातावरण निर्माण झालं की वीज खंडित होत असते यामधील  काय गोडबंगाल आहे अशी चर्चा देहूरोड करांच्या बैठकीत रंगत होत्या त्यात भर म्हणून आज सायंकाळी जोरदार पावसाची हजेरी वीज पुरवठा खंडित झाला, पाऊस अर्ध्या तासाने थांबला परंतु रात्री पावणे दहा झाले तरी  देहूरोड शहराच्या काही भागात विद्युत वीजपुरवठाही सुरळीत झाला नव्हता, वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे देहूरोड शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.प्रेस मीडिया लाईव्ह 

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post