उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे ...जयंत पाटील

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  राज्यांच्या निवडणुकांचा निकाल कालच लागला आणि त्यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसत आहे .भाजप नेत्यांनी आता पासूनच महाराष्ट्र अभी बाकी हैं, असे म्हणायला सुरूवात केली आहे .यावर  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री  जयंत पाटील यांनी उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे असल्याचा टोला माध्यमांशी बोलताना भाजपला लगावला आहे. 


उत्तर प्रदेशात मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेश मध्ये एकवटले असते तर विजय झाला असता असा दावा करतानाच भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली. त्यामुळे निवडणुका जरी इतर पाच राज्यात पार पडल्या असल्या तरी राज्यातलं वातावरण आता तापू लागला आहे .

 महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजप मधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे.कारवाई व्हावी असे जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिले आहे . देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे फारच गरजेचे आहे  असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. काहीही केले तरी महाविकास आघाडी सरकार पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे असा  टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

Post a Comment

Previous Post Next Post