पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्र . २ मधील मौजे येवलेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 अन्वरअली शेख : सह संपादक

पुणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली येलवाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालेली आहे खालीलप्रमाणे महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिलेली आहे.


अनधिकृत बांधकामावर कारवाई पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्र . २ मधील मौजे येवलेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन सुमारे १ ९ ०८५.०० चौ . फुट . क्षेत्र मोकळे करण्यात आले . सदर कारवाई महाराष्ट्र महानगर अधिनियम कलम ५३ ( १ ) अन्वये नोटीस देऊन करण्यात आली . सदरच्या कारवाईमध्ये स.नं. ३३ पार्ट टीचर्स कॉलनी येथील आशीष कटारिया यांचे ८६० चौ . फुट ज्ञानेश्वर कांबळे यांचे ११० चौ . फुट , अल्ताफ शेख यांचे १६०० चौ . फुट , शिवा यांचे ८१० चौ . फुट , संकेत काकडे यांचे २३२५ चौ . फुट , रघुनाथ घोगरे यांचे ७५० चौ . फुट , आनंद देशमुख यांचे १६०० चौ . फुट , समीर चव्हाण यांचे १६०० चौ . फुट , विनायक शेंडकर व इतर यांचे २६०० चौ . फुट , अश्रफ भाई व इतर यांचे २१५० चौ . फुट , बोहरी व इतर यांचे १३०० चौ . फुट , तसेच पांडुरंग कामठे स.न. १ महादेव मंदिरा शेजारी यांचे ७८० चौ . फुट , संजय मारुती शेंडकर यांचे स.न. १ महादेव मंदिरा शेजारी २६०० चौ . असे एकूण सुमारे १ ९ ०८५.०० चौ . फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले . सदरची कारवाई १० बिगारी , २ जेसीबी , २ ब्रेकर , २ गॅस कटर , तसेच पुणे मनपा व स्थानिक पोलीस कर्मचारी यांचे सहाय्याने पूर्ण करण्यात आली  अशी माहिती. प्र . माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह. पुणे 

Post a Comment

Previous Post Next Post