पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत

 राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली ,  कात्रज डेअरीवर पुन्हा घड्याळ ...



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या 16 जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिन विरोध झाल्या होत्या.या मुळे कात्रज डेअरीवर पुन्हा घड्याळाचाच गजर झाला आहे. उर्वरित दोन जागांपैकी एक जागेवर कॉंग्रेसने तर, दुसऱ्या जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. मावळत्या संचालक मंडळातील दोघांचा पराभव झाला आहे. मात्र यापैकी रामचंद्र ठोंबरे या संचालकांनी ऐनवेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा केवळ तांत्रिक पराभव मानला जात आहे.


नवीन संचालक मंडळात हवेली तालुका मतदारसंघातील गोपाळ म्हस्के हे सर्वात ज्येष्ठ तर, शिरूर तालुका मतदारसंघातील स्वप्नील ढमढेरे हे सर्वात तरुण संचालक ठरले आहेत. दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे (आंबेगाव) यांच्यासह गोपाळ म्हस्के, दिलीप थोपटे (भोर), बाळासाहेब खिलारी (जुन्नर), केशरबाई पवार आणि भगवान पासलकर (वेल्हे) हे संचालक पुन्हा निवडून आले आहेत. मावळत्या पंचवार्षिक मध्ये पावणे पाच वर्षे संचालक असलेले आणि शेवटच्या तीन महिन्यात तां६का कारणाने संचालक पद रद्द झालेले बाळासाहेब नेवाळे (मावळ) पुन्हा निवडून आले आहेत.याशिवाय विद्यमान उपाध्यक्षा वैशाली गोपाळघरे यांचे पती कालिदास गोपाळघरे, संचालक रामदास दिवेकर यांचे चिरंजीव राहुल दिवेकर (दौंड), बाळासाहेब ढमढेरे यांचे चिरंजीव स्वप्नील ढमढेरे (शिरूर) हे निवडून आले आहेत.

खेड तालुका मतदारसंघातून विद्यमान संचालक चंद्रशेखर शेटे यांचा पराभव झाला आहे. येथून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती अरुण चांभारे निवडून आले आहेत. या चार नवीन चेहऱ्यांसह लता गोपाळे (महिला राखीव), भाऊ देवाडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), निखिल तांबे (विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघ), मारुती जगताप (पुरंदर) आणि चंद्रकांत भिंगारे हे नऊ नवीन चेहरे निवडून आले आहेत.

संचालक मंडळाच्या १६ पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या ११ जागांसाठी रविवारी (ता.२०) मोठ्या चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यात पैकीच्या पैकी (१०० टक्के) मतदान झाले होते. सोमवारी (ता.२१) सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू झाली आणि मतमोजणीनंतर लगेच मतदारसंघनिहाय निकाल जाहीर करण्यात आल्याचे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी बाळासाहेब तावरे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post