युक्रेन मधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सरकारी खर्चाने प्रवेश द्यावा

   कॉंग्रेस खासदार दिग्विजयसिंह यांची केंद्र सरकारकडे मागणी.

प्रेस मीडिया लाईव्ह

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

युद्धभूमी रशिया-युक्रेन मधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवण्याची संधी देत भारतातील विविध सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सरकारी खर्चाने प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवावी अशी मागणी कॉंग्रेस खासदार दिग्विजयसिंह यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

दिग्विजयसिंह म्हणाले, या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी युक्रेनस्थित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आधीच बराच पैसा खर्च केला आहे, त्यामुळे त्यांना येथील कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना पुन्हा खर्च करणे परवडणारे नाही असे दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

या विद्यार्थ्यांना नियम शिथिल करून देशातील विविध खासगी आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी केंद्राने विशेष योजना आखावी, असेही  दिग्विजयसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतची अनिश्‍चितता दूर करेल, अशी आशाही राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह यांनी  आशा व्यक्त केली आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

Post a Comment

Previous Post Next Post