युद्धाच्या नावाखाली महागाई वाढवून सामान्य जनतेची लुटमार सुरू.

 युध्द आणि खाद्यतेल व्यापाऱ्यांची चांदी..

प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवरअली शेख :

काल खाद्यतेल खरेदीसाठी दुकानात गेलो. सध्याचा सूर्यफूल तेलाचा 15 kg चा रेट विचारला तर रु 3000, मग कॉटन सीड म्हणजे सरकी तेलाचा रेट विचारला तर तो 2700 रु. उत्तर काय येणार हे माहीत असून देखील मी विचारले की इतके का दर वाढले आहेत? तर दुकानदार म्हणाला की युद्ध चालू आहे आणि खाद्यतेल तिकडून येते त्यामुळे दर वाढले आहे आणि उद्या पुन्हा 100 ते 200 रु वाढतील.

मी एक साधा सोपा प्रश्न त्यालाही उपस्थित केला तो मी सामान्य जनतेला,  ही उपस्थित करतो. आणि आशा बाळगतो की जाणते  मधील जगृकाणी विचार करणारे,व लोकांच्या न्याय हककासाठी लढणारे ,ग्राहक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सुद्धा यावर आवाज उठवावा. प्रश्न असा आहे की युद्ध सुरू होऊन 8-10 दिवस झाले आहेत. आता ज्या खाद्यतेल उत्पादनावर युद्धाचा परिणाम म्हणून दर वाढविले जात आहेत त्याचे उत्पादन हे युद्धा पूर्वीचे आहेत आणि ते प्रत्येक डब्यावर लिहिले आहे. असे असताना साठेबाजी करून युद्धाचे कारण पुढे करून ग्राहकाला लुटण्याचा प्रकार चालू आहे. आधी MRP पेक्षा कमी किंमतीत मिळणारे तेल आज MRP पेक्षा जास्त किंमतीला विकले जात आहे. ग्राहकाच्या खिशावर या पद्धतीने एकप्रकारे दरोडा टाकला जात आहे. याची माहिती प्रशासनास असेल देखील पण प्रशासन डोळे झाकून गप्प बसले आहे. 

सदर विषयाची दखल ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मानवी हक्क आयोग यांनी घेतली पाहिजे असे वाटते.

युद्धाच्या नावाने  भरमसाठ महागाई वाढवून सामान्य जनतेला लुटण्याचे प्रकार  आता सुरू झाले आहेत ,रुपया वाढला तर दहा रुपये वाढवून घेण्याचे प्रकार हल्ली वाढत चालले आहे. युद्धाच्या नावाखाली सामान्य जनतेची होणारी लूट ही थांबली पाहिजे यावर प्रशासनाने ही बारीक नजर ठेवण्याची गरज आहे . जनप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी ही या कडे लक्ष घालावे अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे 


Post a Comment

Previous Post Next Post