अजान सुरु होताच अजित दादा पवार यांनी आपले भाषण थांबवलं.

नागरिकांनी  टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक) :

 पुणे : जिल्ह्यातील पुण्यातील वडगावशेरी मध्ये एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार  उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित दादा पवार बोलत असताना जवळ असलेल्या मशिदीत अजान सुरु झाली नमाज पठण केलं जात असल्याचा आवाज येताच अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं.


 काही काळ कार्यक्रमाला उपस्थित सारेच शांत झाले होते.त्यानंतर पुढच्या काही वेळात अजान संपताच पवारांनी भाषणाला सुरुवात केली. या वेळेस नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.

Post a Comment

Previous Post Next Post