आज सोमवार पासून महानगरपालिकेत प्रशासक राजवट

 महानगरपालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमणूक ..

नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते या पुढे नगरसेवकच राहणार नाहीत.ते सर्वसामान्य नागरिक असतील.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख ;

पुणे : महानगरपालिकेचा कालावधी संपल्यानंतर आज सोमवार पासून महानगरपालिकेत प्रशासक राजवट करणार आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते या पुढे नगरसेवकच राहणार नाहीत.ते सर्वसामान्य नागरिक असतील. आणि पुढे महानगरपालिकेवर प्रशासक नेमले जाईल.

महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. त्या मुळे पुणे महानगरपालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यकाळ संपल्याने महानगरपालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या.. त्यामुळे सोमवारपासून प्रशासक या नात्याने आयुक्त सर्व निर्णय घेतील. नगरसेवक व पदाधिकारी यांना असलेल्या सर्व सोयी सुविधा संपुष्टात येणार आहेत. या मध्ये महापौर पासून ते सर्व नगरसेवक पदावरून पाय उतार होतील.

दरम्यान महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय आंकडे कामाचे विभाजन केले जाऊ शकते. स्थानिक पातळीवर अडचणी यापूर्वी नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना आता नगरसेवकांचा कोणताही संबंध राहणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post