पुणे शहर एम आय एम यांनी प्रस्तावित जागी हज हाऊस बांधण्यात यावे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे मागणीचे पत्रक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले

महानगापालिकेने वेळेत पायाभरणी पुर्ण न केल्याने हज हाऊसच्या जागेवर अतिक्रमण....

प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे दि. १३  पुणे शहरातील कोंढवा साईबाबा नगर परिसरात हज हाऊस बांधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी पुणे शहर एम आय एम तर्फे करण्यात आली.

त्यावेळी शाहिद भाई शेख अध्यक्ष युवक पुणे शहर एम आय एम,मुबिन खान उपाध्यक्ष पुणे शहर युवक, विलास कांबळे अध्यक्ष कॅंटोनमेंट पुणे शहर एम आय एम, साबिर शेख सेक्रेटरी पुणे शहर एम आय एम,विनोद धेडे युवक अध्यक्ष पुणे शहर एम आय एम, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

 साईबाबा नगर कोंढवा पुणे ४८ येथील  स. न. ४६ या ठिकाणी  प्रस्तावित  हज हाउस डिसेंबर २०१६ रोजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार यांच्या हस्ते विषयांकित हज हाऊस चे भुमिपूजन करण्यात आले होते.तसेच हज हाऊस उभारणी साठी  आपण आपल्या निधीतून निधी उपलब्ध करून दिला होता . त्यानुसार पुणे महानगरपालिके मार्फत हज हाउस ची पायाभरणी केलेली आहे .  परंतु हज हाऊस चे ८००० चौ . फुट जागेत फाउंडेशन होणे गरजेचे होते . तसे न  करता महानगरपालिके मार्फत हज हाऊसच्या पाया भरणीचे काम  अर्धवट ठेवल्यामुळे सदर जागेवर अतिक्रमण  झालेले असून आता केवळ अंदाजे ५००० स्क्वे . फुट जागा शिल्लक राहीलेली आहे . तरी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून अस्तित्वात असलेल्या आगेत बांधकाम सुरु करणे व निधी प्राप्त करण्यासाठी  संबंधीताना त्वरीत सूचना करण्यात यावी. पश्चिम महाराष्ट्रसाठी पुणे येथील मुस्लिम समाजाला पुणे कोढवा या ठिकाणी  हज हाउस निर्मिती करून धार्मिक कामा करीता  मिळावा व मुस्लिम समाज बांधवाना योग्य तो न्याय दयावा . असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वरअली शेख : (सह संपादक)

Post a Comment

Previous Post Next Post