विशेष वृत्त : दिल्ली मधील सत्तेसाठीची खरी लढाई ही २०२४ मध्येच लढली जाईल...प्रशांत किशोर .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 नवी दिल्ली - कालच  लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपाने दणदणीत यश मिळवले. भाजपाने या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवले.तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला धोबीपछाड देत निर्विवाद बहुमत मिळवले. दरम्यान, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे.


 ते म्हणाले की, या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भारतीय जनता पक्ष विरोधकांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिल्ली मधील सत्तेसाठीची खरी लढाई ही कुठल्याही राज्यातील निवडणुकीतून नाही तर, २०२४ मध्येच लढली जाईल.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, भारता साठीची ही लढाई २०२४ मध्ये लढली जाईल. कुठल्याही राज्यातील निवडणुकांमधून ती लढली जाणार नाही. मोदी साहेब हे ओळखतात. त्या मुळेच विरोधकांवर चाणाक्षपणे मानसिक आघाडी घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे तुम्ही या खोट्या नरेटिव्हच्या जाळ्यात फसू नका.गेल्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यामध्ये प्रशांत किशोर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांचे मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र आता ही नाराजी दूर झाली आहे. तसेच राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या सोबत करार सुरू ठेवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतल्याचे वृत्त आहे.


Post a Comment

Previous Post Next Post