पुणे बार्टी 2018 च्या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश

  मागण्या येत्या BOG च्या बैठकीत ठेऊन मान्य करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले व उपोषण तात्पुरते स्थगित केले.

प्रेस मीडिया लाईव्हच्या दणक्याने प्रशासन  खडबडून जागे झाले..

प्रेस मीडिया लाईव्ह

 अन्वरअली शेख : (सह संपादक ) 

पुणे दि.१२ . विद्याच्या माहेर घरात मागील चार, पाच दिवसापासून सतत पुणे बार्टी २०१८ संशोधक विद्यार्थ्यांचा आंदोलन व आमरण उपोषण केले जात होते. 

2018 संशोधक विद्यार्थ्यांना एम फिल ते पीएचडी सलग पाच वर्षाचा विद्यावेतन  ( फेलोशिप ) मिळावा व पीएचडी च्या संशोधक विद्यार्थ्यांचा  विद्यावेतन ( फेलोशिप ) कालावधी तीन वर्ष वरून वाढवून पाच वर्ष पूर्ण करण्यात यावा  विद्यार्थ्यांनी या मागणीला जोर धरला होता. प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक व आदर्श पत्रकार महासंघाच्या वतीने महबूब सर्जेखान यांनी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. विविध सामाजिक संघटनांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळत होता. प्रेस मीडिया लाईव्हचे सहसंपादक अन्वर अली शेख यांनी ही  सारख्या बातम्या लावून धरल्या होत्या त्या मुळे प्रशासन खडबडून जागे .

 पुणे शहर विद्येचे माहेरघर असून सुद्धा बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना उपोषण करण्याची वेळ ओढवली हे दुर्दैवच म्हणावं लागेल, त्यात अजून भर समाज कल्याण कार्यालय विभाग हाकेच्या  अंतरावर असून सुद्धा बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिय यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट तिसऱ्या दिवशी घेतली, उपोषण करणारे  विद्यार्थी आपल्या निर्णयावर ठाम होते .

जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेत विद्यार्थि होते , आज बार्टी अधिकाऱ्यांमार्फत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या बाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की समाज कल्याण विभाग आयुक्त यांनी आमची भेट घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली आहे,

बार्टी 2018 संशोधक विद्यार्थ्यांच्या एमफिल ते पीएचडी सलग पाच वर्षाचा विद्यावेतन ( फेलोशिप ) मिळावा व पीएचडी च्या संशोधक विद्यार्थ्यांचा विद्यावेतन ( फेलोशिप ) कालावधी तीन वर्षां वरून वाढवून पाच वर्षापर्यंत व्हावा, या मागणीला  यश मिळताना दिसत आहे म्हणून उपोषण स्थगित करण्यात आला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह 

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post