पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीं मध्ये वाढ होण्याची शक्यता


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक ) 

 पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला पुण्याच्या  पोलीस आयुक्त असताना पुणे पोलिसांना डिजीटल गुन्ह्यात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.या दोन्ही आरोपींनी बिटकॉईन  घोटाळ्यातील काही रक्कम स्वत: च्या आणि सहकाऱ्यांच्या खात्यात वळवली होती. त्या मुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीं मध्ये  वाढ होण्याची शक्यता आहे.



पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पंकज घोडे  आणि रवींद्र पाटील अशी आहेत. या दोघांनी २०१८ साली उघडकीस आलेल्या बीटकॉईन घोटाळ्यातील पैसै स्वतःच्या खात्यांवर आणि पुढे त्यांच्या सहकाऱ्यांच्या खात्यावर वळते केल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं आहे. २०१८ मध्ये पुण्यात बीटकॉईनमधे गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. रश्मी शुक्ला तेव्हा पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. या प्रकरणात पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यावेळेस ‘ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन’च्या पंकज घोडे आणि के. पी.एम. जी.  कंपनीच्या रविंद्र पाटील यांची तांत्रिक मदत घेतली होती.

या दोघांनी या प्रकरणाचा तपास करताना त्यांच्याकडे जमा झालेल्या डेटाचा उपयोग करुन या प्रकरणातील अटक आरोपींच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधुन क्रीप्टो  करन्सी स्वतःच्या खात्यांवर वळती करून घेतली.त्यानंतर ही क्रिप्टो करन्सी इतरांच्या खात्यांमधे पाठवण्यात आल्याचे केवायसी  वरून स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे.या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांच्या चौकशीतून त्यांच्या या कृत्यात सहभागी असलेल्या आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या इतरांची नावे उघड होतील असं पुणे पोलिसांनी म्हटलं.



अनवरअली शेख : (सह संपादक )

Post a Comment

Previous Post Next Post