सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्याने आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 मुंबई :  राज्य सरकारने दाखल केलेला अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधना शिवाय तयार करण्यात आला असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्याने आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

याच प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, 'ओबीसीचं आरक्षण ठेवून निवडणुका व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे. राज्य सरकार कुठेही कमी पडले नाही. जो डेटा हवा आहे तो केंद्राकडे आहे राज्याकडे नाही. केंद्राने डेटा दिला असता तर ही वेळच आली नसती. मात्र, भाजपला समान नागरी कायदा आणायचा आहे. त्यांना आरक्षणच ठेवायचं नसल्याचे यावरुन दिसतं असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post