कोल्हापूर मधील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय.

पुण्यात स्थलांतरीत करण्याच्या कामाला गती ..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर प्रतिनीधी : मुरलीधर कांबळे

 कोल्हापूर मधील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आता पुण्यात स्थलांतरीत करण्याच्या कामाला गती येऊ लागली आहे. राज्याच्या गृहविभागाने कोल्हापूरचे आयजी ऑफिस  पुण्याला स्थलांतरीत करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या सोबत पत्र व्यवहार केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या गृह विभागाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन त्याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहे. मागील 27 वर्षापासूनच कोल्हापूरातील आयजी ऑफिस  पुण्याला हलविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

कोल्हापूर, सातारा , सांगली पुणे ग्रामीण  सोलापूर ग्रामीण  या पाच जिल्ह्यांच्या पोलीस खात्याचा कारभार या कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून चालतो. सर्वसामान्य नागरिकांशी तसा या कार्यालयासोबत थेट संपर्क येत नसला तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तक्रारींचे निवारण न झाल्यास त्याबाबत नागरिकांना थेट आयजी कार्यालयात दाद मागता येत होती.

तसेच पाच जिल्ह्यातील पोलीस दलाचे प्रशासकीय कामकाज याच कार्यालयातून चालते. मात्र हे कोल्हापूरमध्ये असणे म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे. पण आता हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली 1955 पासून सुरु आहेत. नुकतेच गृहविभागाने अहवाल मागविल्याने  कामास गती आली आहे.

परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या दोन जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख  वाढत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेट देणं सोयीचं व्हावं.तसेच वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या बैठका यासाठी पुणे हेच ठिकाण सोयीचे असल्याने हे कार्यालय पुण्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचालींना सुरवात झाली आहे.

महाराष्ट्र  व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमाप्रश्नासाठी कोल्हापूरात 1965 मध्ये पाच जिल्ह्यांसाठी उपमहानिरीक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर याचे रुपांतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात करण्यात आले. मात्र आता बदलत्या परिस्थितीनुसार हे कार्यालय पुणे येथे सोयीचे ठरणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले की,
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याचा तसा जुनाच प्रस्ताव आहे.स्थलांतरित करण्याबाबत गृहखात्याने नुकताच अहवाल मागवला आहे.त्याबाबत अभ्यास करुन अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post