नवाब मलिक यांची आज ईडी कोठडीची मुदत संपणार...? की..परत वाढणार..?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाची अर्थात ईडीची कोठडीची मुदत दिनांक.7 ला संपत आहे.  ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात आज हजर करतील. सुनावणीत नवाब मलिक यांची ईडी कोठडीची  मुदत संपणार...?  की..परत  वाढणार..?  या कडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत




नवाब मलिक यांची यापूर्वी 4 मार्च रोजी संपत होती परंतु तेव्हा न्यायालयाने कोर्टाने त्यांना 7 तारखेपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला होता. नवाब मलिक हे चौकशी आणि तपासाला सहकार्य करत नाहीत. उलट ते ईडीच्या अधिकाऱ्यांनाच धमक्या देत आहेत, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. याबाबत ईडीने काही कागदपत्रे कोर्टाला सादर केली आणि नवाब मलिक यांच्या कोठडीची मुदत वाढ मागितली. कोर्टाने नवाब मलिक यांची कोठडी 7 मार्च पर्यंत मुदत वाढवली होती.नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post