सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अजिंक्य रोहेकर 'रायगड भूषण' पुरस्काराने सन्मानित



प्रेस मीडिया ऑनलाईन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

 सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल अजिंक्य बाळाराम रोहेकर यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या  रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

अलिबाग येथे झालेल्या समारंभात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती निलीमा पाटील, तसेच अजिंक्य यांच्या आई व आरे बुद्रुकच्या केंद्रप्रमुख विद्या रोहेकर आणि कुटुंबीय, आदर्श शिक्षक ब्रिजेश भादेकर उपस्थित होते. 

   अजिंक्य रोहेकर पदवीधर असून त्यांनी आपली आई विद्या रोहेकर यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे अखंडपणे सुरु ठेवला आहे. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी विद्यालयीन शिक्षणापासून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत एक चांगला पायंडा पाडला. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने अजिंक्य रोहेकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रायगड भूषण पुरस्काराने सन्मान केला. त्याबद्दल रोहेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post