भाजपला राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यशप्रेस मीडिया लाईव्ह : 

देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपलाच मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. लखनौ मधील कार्यालयात 1.5 वर्षांचा मुलगा योगी आदित्यनाथ यांच्या रुपात दिसून आला.

उत्तर प्रदेशात प्राथमिक कल पाहता भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. या सोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आता एका झटक्यात राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. भाजपाचे कार्यकर्ते पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपला आनंद साजरा करत आहेत.

संपूर्ण राज्यात भाजपच्या विजयाचं सेलिब्रेशन सुरू असून भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयात गर्दी करतानाचे चित्र आहे. दुसरीकडे लखनौ येथील पक्ष कार्यालयात एक 1.5 वर्षांचा चिमुकला योगी आदित्यनाथ यांच्या पेहरावात दिसून आला. विशेष म्हणजे त्याचा हातात बुलडोझर असून कपाळी टीळाही दिसून येत आहे. योगींनी बुलडोझर भरुन मतं मिळवली, असे संकेत या चिमुकल्याच्या हातातील बुलडोझर देत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post